Join us

मोठी बातमी! हल्लीच शूट झालेले 'पुष्पा २'मधील सीन्स दिग्दर्शक करणारेय डिलिट,कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 18:01 IST

Pushpa 2 : 'पुष्पा २' अर्थात पुष्पा: द रुल बद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

पुष्पा २ अर्थात पुष्पा: द रुल (Pushpa 2) बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू असून लवकरच शूटिंग पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात होते. पण आता मीडिया रिपोर्ट्समध्ये अशा धक्कादायक बातम्या आल्या आहेत की चाहते चकित होऊ शकतात. पण जे काही केलं जातंय ते फक्त रसिकांचा आणि चित्रपटाचा दर्जा सुधारण्यासाठी केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटाचे शूटिंग थांबवले आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सध्याच्या शूटिंगवर खूश नव्हते. त्यामुळे सध्याच्या शूटचे फुटेज डिलीट करायचे आणि मग नव्याने करायचे असे त्याने ठरवले आहे. अशा प्रकारे त्याला पुष्पा पेक्षाही चांगला चित्रपट बनवायचा आहे. अधिकृतरित्या चित्रपटाच्या टीमने अद्याप काहीही सांगितलेले नाही.

सुकुमार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज'चे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला हिंदीपासून सर्व भाषांमध्ये भरभरून प्रेम मिळाले. चित्रपटाचे बजेट सुमारे २०० कोटी रुपये होते तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३७० कोटींची कमाई केली होती.हा चित्रपट अतिशय मनोरंजक वळणावर प्रदर्शित झाला. चित्रपटातील संवाद आणि गाणी रसिकांना खूप आवडली आणि या चित्रपटाला देश-विदेशात प्रचंड लोकप्रियताही मिळाली. पुष्पाचा पुढचा भाग 'पुष्पा: द रुल' हा पुढच्या वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुन