बिग बी अमिताभ बच्चन यांना भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांचे नव्या-जुन्या सर्वच चित्रपटांना आजही पसंत केलं जातं. यापैकी एक चित्रपट म्हणजे सूर्यवंशम जो अनेकदा चर्चेत राहतो. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष लोटली. पण आजही टीव्हीवर तो येत असल्यामुळे चर्चेचा विषय ठरतो.
एका प्रेक्षकाने सेट मॅक्सला चित्रपट पुन्हा पुन्हा दाखवण्यासाठी पत्र लिहिल्यानं हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवालही पत्रात करण्यात आलाय. याशिवाय त्या व्यक्तीनं आपल्याला सूर्यवंशम पीडित असंही म्हटलंय. सध्या सोशल मीडियावर एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 'सूर्यवंशम' पाहून एक व्यक्ती त्रासल्याचं दिसून येतंय. त्यांनी आपल्या समस्येबाबत वाहिनीला पत्र लिहिलं आहे, ज्यामध्ये त्यांनी चित्रपट अजून किती दिवसात प्रसारित होणार याची विचारणा केली आहे.