Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमी जे तोमार! विद्या बालनची मंजुलिका रुहबाबाला पछाडणार? 'भूल भूलैय्या ३'चा भयानक टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:46 IST

'भूल भूलैय्या ३' चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज झालाय. तिसऱ्या भागात विद्या बालनची मंजुलिका घाबरवायला सज्ज आहे (bhool bhulaiyya 3)

गेल्या अनेक महिन्यांपासून 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला आहे. 'भूल भूलैय्या ३' सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्तिक आर्यन भूतांना आटोक्यात आणायला सज्ज आहे. काही दिवसांपासून 'भूल भूलैय्या ३'चे पोस्टर समोर आले आहेत. अशातच आज नुकतंच 'भूल भूलैय्या ३'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष गोष्ट म्हणजे पहिल्या भागात विद्या बालनला पछाडलेली मंजुलिका पुन्हा प्रेक्षकांचा थरकाप उडवायला आली आहे.

'भूल भूलैय्या ३'चा टीझरमध्ये काय?

'भूल भूलैय्या ३'च्या टीझरमध्ये बघायला मिळतं की, माझं सिंहासन कोणाला दिलं? असं म्हणत चवताळलेली मंजुलिका एका राजाला फरफटत नेताना दिसते.  पुढे बंद दाराआड मंजुलिकाच्या रुपात विद्या बालन खुर्ची हातात घेऊन आक्रोश करताना दिसते. नंतर सगळीकडे गुलाल उधळलेला दिसतो. लाल रंगामध्ये हातात मशाल धरत संपूर्ण काळ्या कपड्यात कार्तिक आर्यनची एन्ट्री होताना दिसते. पुढे तृप्ती डिमरी रोमँटिक अंदाजात पाहायला मिळते. कार्तिक आर्यन आणि मंजुलिकाचा थेट सामना होताना दिसणार आहे.

या दिवशी रिलीज होणार 'भूल भूलैय्या ३'

'भूल भूलैय्या'च्या पहिल्या भागात दिसलेली विद्या बालन 'भूल भूलैय्या ३'मध्ये पुन्हा एकदा भेटीला येणार असल्याने सर्वांना आनंद झालाय. विद्या बालनला पछाडलेल्या मंजुलिकासोबत कार्तिक आर्यन थेट भिडताना दिसणार आहे. या दिवाळीत 'भूल भूलैय्या ३' रिलीज होताना दिसणार आहे. अजून सिनेमाची निश्चित तारीख जाहीर झाली नाहीय. अनीस बाझमींनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनविद्या बालनतृप्ती डिमरी