Join us

मोदीजी, माझी मदत करा! भोजपुरी अभिनेत्रीने ढसाढसा रडत सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 13:06 IST

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री नेहा बन्सल हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

ठळक मुद्देएका संकेतस्थळाच्या माध्यमातून नेहा व विजय एकमेकांच्या संपर्कात आलेत.

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री नेहा बन्सल हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. होय, नेहा या व्हिडीओत रडत रडत आपबीती सांगतेय. या व्हिडीओत नेहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मदतीची गळ घातली आहे.‘मला पतीने सोडले, त्याने मला मारहाण केली. माझ्या पतीकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. मला आईवडिल नाहीत. लग्नासाठी मी माझ्याकडची सर्व संपत्ती विकली. पण पतीने कधीही मला त्याच्या घरी नेले नाही. त्याने माझी फसवणूक केली.

तो अमेरिकी नागरिक आहे. पीएम मोदी व भारतीय कायदा माझे काहीही बिघडवू शकत नाही, असे तो आता म्हणतोय. तीन दिवसांपासून उपाशापोटी मी पोलिस ठाण्यांच्या पाय-या झिजवतेय. मोदीजी प्लीज माझी मदत करा. माझा पती मला सोडून अमेरिकेला जाण्याच्या तयारीत आहे. तो अमेरिकेत पळाला तर माझ्याजवळ मरण पत्करण्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग उरणार नाही. त्यामुळे मोदीजी, कृपा करून माझ्या पतीला अमेरिकेत जाण्यापासून थांबवा,’ असे नेहा या व्हिडीओत म्हणतेय. नेहाच्या पतीचे नाव विजय असल्याचे कळतेय.

काय आहे प्रकरणनेहाने केलेल्या दाव्यानुसार, सहा महिन्यांपूर्वी तिने लग्न केले. आई-वडिल नसल्याने नेहाने स्वत: लग्नाचा संपूर्ण खर्च केला. यासाठी स्वत: जवळची असली नसली तेवढी संपत्ती विकली. पण लग्नानंतर पतीने पत्नी म्हणून नेहाची एकही जबाबदारी स्वीकारली नाही. तिच्या पतीकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. आता त्याने नेहाला एकटीला भारतात सोडून अमेरिकेला पळण्याची तयारी सुरु केली आहे.

 एका मुलाखतीत नेहाने सांगितल्यानुसार, एका संकेतस्थळाच्या माध्यमातून नेहा व विजय एकमेकांच्या संपर्कात आलेत. यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाआधी नेहाने तिचे घर 70 लाखांत विकले.