Join us

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 15:27 IST

नुकतंच भारतीने एका व्लॉगमध्ये त्यांनी नवीन ऑफिस विकत घेतल्याचं सांगितलं.

भारती सिंह हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. भारती सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचिया कायम चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. भारती आणि हर्षची जोडी ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे.  ही जोडी कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करते. नुकतंच या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हर्ष आणि भारती यांनी मुंबईत नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

हर्ष आणि भारती या दोघांंचं एक युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवर व्लॉग शेअर करत दोघेही रोजच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देतात. नुकतंच भारतीने एका व्लॉगमध्ये त्यांनी नवीन ऑफिस विकत घेतल्याचं सांगितलं. हर्षसोबत ती तिचं नवीन ऑफिस बघायला पोहोचली होती. तिने शेअर केलेल्या व्लॉगमध्ये त्यांच्या नव्या ऑफिसची झलक पाहायला मिळतेय. 

भारतीच्या ऑफिसमध्ये अनेक खोल्या असून ते डुप्लेक्स आहे. याव्यतिरिक्त, मेकअप आणि स्टाइलिंगसाठी एक विशेष खोली आहे. भारती आणि हर्ष नवीन इमारतीत त्यांचा व्यवसाय स्थलांतरित करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत दोघांचं अभिनंदन केलं आहे. 

कॉमेडीक्वीन भारती सिंहने हिंदी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आज भारती अनेक शोचं सूत्रसंचालन करत असून यशस्वीरित्या युट्यूब चॅनेल आणि पॉडकास्टही सांभाळत आहे. भारती सिंगनं इंडस्ट्रीत गॉडफादर नसताना स्वबळावर स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं.  भारतीचा इथपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता.  पंजाबमधील अमृतसर येथे लहानाची मोठी झालेल्या  बराच स्ट्रगल करावा लागला.

भारतीकडे जवळपास 23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारतीचं शूटर बनण्याचं स्वप्न होतं. कॉलेजमध्ये असताना शूटिंगमध्ये तिने सुवर्णपदक मिळवलं होतं. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तिने तिचं स्वप्न सोडून दिलं. भारतीला आता शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी सहा ते सात लाख रुपये मानधन मिळतं. भारतीने पती हर्ष लिंबाचियासोबत अनेक टीव्ही शो होस्ट करताना दिसली आहे. 

टॅग्स :भारती सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडमुंबई