Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'या' दिवशी रिलीज होणार सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर, सोशल मीडियावर फॅन्सचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 12:00 IST

सलमान खान आणि कॅटरिना कैफचे फॅन्स 'भारत' सिनेमाची घोषणा झाल्यामुळे एक्साईटेड आहेत. भाईजानचा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे24 एप्रिलला सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहेदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खान आणि कॅटरिना कैफचे फॅन्स 'भारत' सिनेमाची घोषणा झाल्यामुळे एक्साईटेड आहेत. भाईजानचा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता भारतचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने सिनेमाच्या ट्रेलर कधी रिलीज होणार याची घोषणा केली आहे. 24 एप्रिलला सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. 

 

 

 

 

 

ट्रेलरची डेट ऑऊट झाल्यापासून सलमानच्या फॅन्सनी सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सलमान आणि कॅटरिनाच्या जोडीचा भारत सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारतातल्या अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. 

यात आधी सलमानसोबत देसीगर्ल प्रियंका चोप्रा दिसणार होती मात्र प्रियंकाने सिनेमात काम करण्यास नकार दिल्यानंतर तिच्या जागी कॅटरिनाची वर्णी लागली. सिनेमाचे शूटिंग लुधियाना, माल्टा, दिल्ली आणि अबू धाबीमधले सुंदर लोकेशन्सवर करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे. हा सिनेमा कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. 

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफ