Bhagyashree Patwardhan: १९८९ मध्ये ब्लॉकबस्टर 'मैंने प्यार किया' या पहिल्याच चित्रपटातून स्टारडम मिळविणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सलमान खान बरोबरचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, भाग्यश्रीने संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे तिला एका रात्रीत स्टारडम मिळाले. या चित्रपटासाठी भाग्यश्रीला १९९० मध्ये ३५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 'मैंने प्यार किया' साठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार मिळण्यासह सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकनही मिळालं होतं. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने सुरुवातीला ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट नाकारला असल्याचा खुलासा केला आहे.
अलिकडेच अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने रेडिओ नशा ला मुलाखत दिली.
दरम्यान, अभिनेत्रीला ‘मैंने प्यार किया’ चित्रपट नाकारण्यामागचं कारण विचारलं गेलं. त्यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली,"त्यावेळी मी फक्त १८ वर्षांची होते. मी कॉलेजमध्ये होते आणि पुढील शिक्षणासाठी मला परदेशात जायचं होतं.चित्रपटांमध्ये काम करण्याचा मी कधी विचारही केला नव्हता."
यावेळी अभिनेत्रीने खुलासा केला की, सुरुवातीला ती बराच काळ सूरज बडजात्या यांना वेगवेगळी कारणे द्यायची. "मी सूरजजींना सांगितले की मी विशिष्ट प्रकारचे कपडे घालणार नाही. मला शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतरच मी शूटिंग करू शकेन. मी प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगितले की, त्यांच्याकडे तयार उत्तर असायचं." पण, सुरज यांनी तिच्या सगळ्या अटी मान्य केल्या. मग भाग्यश्री पटवर्धन म्हणाली,"ते मला म्हणायचे की आम्ही सगळं काही जुळवून घेऊ, पण आम्हाला या चित्रपटात फक्त तूच हवी आहेस."
‘मैंने प्यार किया’या चित्रपटामुळे भाग्यश्री पटवर्धन हे मराठमोळं नाव रातोरात प्रसिद्ध झालं. त्यादरम्यान आलेले अनुभव शेअर करत ती म्हणाली, "त्यावेळी पोस्टमन घरी पत्रं आणायचा. आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो आणि तळमजल्यावरून वर जाणारा जिना पत्रांनी भरलेली असायचा." असा किस्सा अभिनेत्रीना सांगितला.
दरम्यान, भाग्यश्री पटलवर्धन 'राजा शिवाजी' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या सिनेमात तिने स्वराज्यजननी 'राजमाता जिजाऊ' यांची भूमिका साकारली आहे.
Web Summary : Bhagyashree initially refused 'Maine Pyar Kiya' due to her young age and plans for further education abroad. Despite her conditions, director Sooraj Barjatya insisted on casting her, eventually convincing her to take the role. She is currently playing Jijabai in 'Raja Shivaji'.
Web Summary : भाग्यश्री ने कम उम्र और विदेश में शिक्षा प्राप्त करने की योजना के कारण शुरू में 'मैंने प्यार किया' को अस्वीकार कर दिया। उनकी शर्तों के बावजूद, निर्देशक सूरज बड़जात्या ने उन्हें लेने पर जोर दिया, और आखिरकार उन्हें भूमिका निभाने के लिए राजी कर लिया। वह फिलहाल 'राजा शिवाजी' में जीजाबाई की भूमिका निभा रही हैं।