Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bell Bottom: देशभक्तीवर आधारित असेल अक्षय कुमारचा हा नवा सिनेमा, LEAK झाली कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 15:13 IST

जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून या सिनेमाबाबत त्याच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. सर्वांनाच या सिनेमाच्या कथेबाबत जाणून घ्यायचं आहे.

लॉकडाऊन आणि कोरोना संक्रमणाच्या काळात अक्षय कुमार याच्या आगामी 'बेल बॉटम' सिनेमाचं शूटींग पुन्हा सुरू झालंय. जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून या सिनेमाबाबत त्याच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. सर्वांनाच या सिनेमाच्या कथेबाबत जाणून घ्यायचं आहे. आता असा अंदाज होता की, हा सिनेमा एका साउथ सिनेमाच रिमेक आहे. पण आता सांगितलं जातंय की, या सिनेमाची कथा पूर्णपणे नवीन आहे.

काय आहे कथा?

'बेल बॉटम' सिनेमाच्या कथेबाबत 'पिंकविला'च्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा सिनेमा प्लेन हायजॅकिंगवर आधारित असणार आहे. तर अक्षय कुमार या सिनेमात एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. तो भारतीय विमानाच्या अपहरणाचं कोडं सोडवत आहे. या रिपोर्टनुसार, 'बेल बॉटम' ची कथा ८० च्या दशकात झालेल्या एका प्लेन हायजॅकिंगवर आाधारित असेल. ज्यात अक्षय कुमार एक गुप्तहेर असेल. तर लारा दत्ता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीची भूमिका करताना दिसणार आहे.

या सिनेमाच्या कथेनुसार, ८० च्या दशकात अनेक आश्चर्यकारक घटना घडल्या होत्या. तेव्हा  देशात इंदिरा गांधी यांचं सरकार होतं. त्यावेळी अनेक प्लेन हायजॅक केले गेले होते. अक्षय कुमार या सिनेमात हेच गुपित उकलताना दिसणार आहे. तसेच या सिनेमात भारत-पाकिस्तान अॅंगलही बघायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. 

बेल बॉटममध्ये अक्षय कुमारसोबत लारा दत्ता आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. वाणी कपूर या सिनेमात अक्षयच्या अपोझिट असणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाची संपूर्ण टीम चार्टर्ड प्लेनने शूटींगसाठी परदेशात गेली. अक्षय कुमारने कोरोना व्हायरस महामारीमुळे 'बेल बॉटम' परदेशात शूट करण्याचा निर्णय घेतलाय.

हे पण वाचा :

विद्युत जामवालसाठी लकी ठरला 'खुदा हाफिज', ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला मिळाला दमदार प्रतिसाद

एका चुकीमुळे पालटले 'या' अभिनेत्याचे आयुष्य, आज राहिला असला शाहरूख खानपेक्षाही अधिक लोकप्रिय

सारा अली खानचे रोहित शेट्टीला वाटते कौतुक, म्हणाला नवाबची मुलगी असूनही कामासाठी पसरले होेते माझ्यापुढे हात

टॅग्स :बेल बॉटमअक्षय कुमारलारा दत्तावाणी कपूरहुमा कुरेशी