Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहीत आहे का किती श्रीमंत आहे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 10:08 IST

कार्तिक आर्यनचे सिनेमे भलेही नंतर हिट झाले असतील पण 'प्यार का पंचनामा' मध्ये दिलेल्या त्याच्या मोनोलॉगने त्याला सोशल मीडियावर हिट करून सोडलं.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन २२ नोव्हेंबर २०२० ला आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. ग्वाल्हेरहून मुंबईला इंजिनिअरींग करायला जातो सांगून आलेल्या  कार्तिक आर्यनला बराच स्ट्रगल करावा लागला. पण आता तो तरूणींमध्ये एक चार्मिंग चेहरा म्हणून लोकप्रिय आहे. बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यनची डिमांड वाढली आहे आणि यामुळे आज त्याच्याकडे पैशांची जराही कमतरता नाही.

तसे कार्तिक आर्यनचे सिनेमे भलेही नंतर हिट झाले असतील पण 'प्यार का पंचनामा' मध्ये दिलेल्या त्याच्या मोनोलॉगने त्याला सोशल मीडियावर हिट करून सोडलं. यानंतर कार्तिकचा 'सोनू के टीटू की स्वीटी' हा सिनेमाही चांगलाच गाजला होता. या सिनेमाने १०० कोटींपेक्षाही जास्त कमाई केली होती आणि सोबतच कार्तिक आर्यन व नुसरत भरूचा यांचं करिअरही मार्गी लागलं होतं.

त्यानंतर कार्तिक आर्यनने 'पती, पत्नी और वो' हा सिनेमा केला. यातीलही त्याच्या कामाचं चांगलंच कौतुक करण्यात आलं. आता तर त्याच्याकडे अनेक सिनेमाच्या ऑफर आहेत आणि तो यातून चांगलं मानधनही घेऊ लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या कार्तिक आर्यनकडे आता ४१ कोटी रूपयांपेक्षा जास्तची संपूर्ण संपत्ती आहे. केवळ २०१९ मध्ये कार्तिकने १० कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती. कार्तिकने त्याच्या आईला ४० लाख रूपयांची मिनी कूपर कार गिफ्ट केली होती.

कार्तिक अखेरचा सारा अली खानसोबत 'लव्ह आज कल'मध्ये दिसला होता. आता तो कियारा अडवाणीसोबत 'भूल भुलैया २' आणि जान्हवी कपूरसोबत 'दोस्ताना २' मध्ये काम करणार आहे. सध्या या दोन्ही सिनेमांचं शूटींग सुरू आहे. तर हे सिनेमे पुढील वर्षी रिलीज होण्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूड