Join us
Daily Top 2Weekly Top 5

राघव शर्माच्या घरी आले धीरेंद्र शास्त्री, सोनू सूदने केलं स्वागत; जॅकलीन अन् शहनाज गिलची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 15:56 IST

युट्यूबर राघव शर्माने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

निर्माता, युट्यूबर आणि इन्फ्लुएन्स राघव शर्माच्या (Raghav Sharma) घरी आज साक्षात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dheerendra Shastri) दाखल झाले. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोकांनी राघव शर्माच्या घराबाहेर गर्दी केली. यावेळी राघव शर्माच्या घरी आधीच अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, शहनाज गिल आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव यांची हजेरी होती. सोनू सूदने स्वत: धीरेंद्र शास्त्री यांचं गळ्यात हार घालत स्वागत केलं. 

युट्यूबर राघव शर्माने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री कारमधून उतरतात. तेव्हा त्यांच्याभोवती लोकांचा गराडा होतो. ते पुढे येतात आणि समोर अभिनेता सोनू सूदला पाहून खूश होतात. सोनू सूद त्यांच्या गळ्यात हार घालत स्वागत करतो.यानंतर सोनू सूद, जॅकलीन फर्नांडिस, शहनाज गिल आणि एल्विश यादव ही मंडळी धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत गप्पागोष्टी करतात. त्यांचं प्रवचनही ऐकतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी बागेश्वर बाबांचे भक्त आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी 'जय श्री राम' अशी कमेंट केली आहे. सेलिब्रिटींना बागेश्वर बाबांचे दर्शन घेताना पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्य वाटलं आहे. टीव्ही अभिनेता करणवीर बोहरानेही आपल्या तीनही लेकींसोबत धीरेंद्र शास्त्री यांचं दर्शन घेतलं. 

टॅग्स :बागेश्वर धामसोनू सूदजॅकलिन फर्नांडिसशेहनाझ गिलमुंबई