Join us
Daily Top 2Weekly Top 5

हाच खरा हिरो ! पूरग्रस्तांसाठी प्रभासने दिला मदतीचा हात, तेलंगानासीएम रिलीफ फंडाला दिली दीड कोटी रुपयांची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 17:00 IST

प्रभासह महेश बाबू, ज्युनिअर एनटीआर, चिरंजीवी यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सीएम रिलीफ फंडामध्ये देणगी दिली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ट्वीट करत मदतीचं आवाहनही कलाकारमंडळींनी केलं आहे.

तमिळ आणि तेलूगु सिनेमाचा स्टार प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र 'बाहुबली- द बिगिनिंग' आणि 'बाहुबली- द कन्कल्युजन' या सिनेमातील भूमिकेमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहचली आहे. तो जे काही करतो त्याची चर्चा होते. रूपेरी पडद्यावर आपल्या अदाकारीने मनं जिंकणारा प्रभास ख-या आयुष्यातही हिरो ठरला आहे.  सामाजिक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असतो. चित्रपटच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही तो देशासाठी काही ना काही करताना दिसत असतो. 

हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने 37 हजारांहून अधिक कुटुंबे प्रभावित झाली आहेत. अतिवृष्टीने तिकडे हाहाकार माजवला आहे. या पूरपरिस्थितीत प्रभास पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या प्रभासने तेलंगाना सीएम रिलीफ फंडाला दीड कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मदतीसाठी पुढे येण्याची प्रभासची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वीही, त्याने पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर कोविड रिलीफ फंडाला एक कोटी रुपयांची देणगी दिली होती.  प्रभासह महेश बाबू, ज्युनिअर एनटीआर, चिरंजीवी यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सीएम रिलीफ फंडामध्ये देणगी दिली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ट्वीट करत मदतीचं आवाहनही कलाकारमंडळींनी केलं आहे. 

ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?

प्रभासचा आगामी सिनेमा 'आदिपुरूष' हा घोषणेपासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. आधी अशी चर्चा सुरू होती की, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कृति सुरेश या सिनेमातील सीतेची मुख्य भूमिका साकारेल.त्यानंतर कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांची चर्चा झाली. पण त्या अफवा ठरल्या.

आता ताज्या रिपोर्टनुसार, या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी क्रिती सेननचं नाव सर्वात वर आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, 'आदिपुरूष' मध्ये मुख्य भूमिकेत क्रिती सेनन दिसू शकते. पण याबाबत अजून काहीच अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या क्रिती सेनन 'Mimi' मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. हा मराठी सिनेमा 'मला आई व्हायचंय' चा हिंदी रिमेक आहे.

टॅग्स :प्रभास