Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या मृतदेहाला खांदा देताना गहिवरला आयुष्यमान, सेलिब्रिटींकडूनही शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 13:17 IST

आयुषमान खुराना त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता. त्याचे वडील पी खुराना यांनीच अभिनेत्याच्या नावाचे स्पेलिंग बदलले आणि त्याला चित्रपटसृष्टीत येण्यास सांगितले.

प्रसिद्ध ज्योतिषी आणि बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाचे वडिल पी. खुराना यांचे शुक्रवारी सकाळी चंदीगड येथे निधन झाले. सायंकाळी साडेपाच वाजता चंदीगड येथील मणिमाजरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, अभिनेता आयुष्यमान खुरानाला दु:ख अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.वडिलांना खांदा देताना आयुष्यमान आणि अपारशक्ती यांना गहिवरुन आले होते. गेल्या २ दिवसांपासून पी खुराना यांना पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकारामुळे त्यांच्यावर २ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.

आयुषमान खुराना त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता. त्याचे वडील पी खुराना यांनीच अभिनेत्याच्या नावाचे स्पेलिंग बदलले आणि त्याला चित्रपटसृष्टीत येण्यास सांगितले. वडिलांना माहित होते की मुलगा आयुषमानची कारकीर्द इंडस्ट्रीमध्ये खास आणि यशस्वी होणार आहे. अशा परिस्थितीत वडिलांचा आशीर्वाद घेऊन अभिनेत्याने चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. वडिलांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळेच आयुष्यमानला सिनेइंडस्ट्रीत नाव कमावता आलं. त्यामुळेच, वडिलांचा मृतदेह स्मशानभूमीकडे घेऊन जाताना आयुष्यमानला अश्रू अनावर झाले होते. 

दरम्यान, बॉलिवूडमधील दिग्गजांनीही या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अजय देवगण, सुनिल शेट्टी, काजोल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शोक व्यक्त करत, आयुष्यमान यांच्याप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणासुनील शेट्टीबॉलिवूड