Join us
Daily Top 2Weekly Top 5

हरिद्वारच्या जोडप्याची हटके प्रेमकहाणी! 'हा' ११ वर्षे जुना सिनेमा होतोय 'OTT'वर ट्रेंड, नाव आहे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:59 IST

११ वर्षांपूर्वीच्या 'या' सिनेमाचा ओटीटीवर धुमाकूळ, टॉप ५ मध्ये होतोय ट्रेंड, तुम्ही पाहिलात का?

Dum Laga Ke Haishya: हल्ली दर महिन्याला थिएटरमध्ये एकामागोमाग अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण,हे चित्रपट ज्यांना थिएटरमध्ये पाहता येत नाहीत अशा लोकांना हे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे घरबसल्या पाहता येत आहेत. त्यामुळे प्रेक्षक थिएटपेक्षा ओटीटीवर चित्रपट, सीरिज पाहण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे अनेक जुने आणि नवे चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग असतात.अशाच एका चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला आहे, जो जवळजवळ ११ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दरम्यान, या चित्रपटाचं नाव  'दम लगाके हईशा' आहे. आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा त्यावेळी प्रचंड चर्चेत होता.आता हा सिनेमानेटफ्लिक्सवर पुन्हा प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे या चित्रपटाने पुन्हा एकदा टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे.

कथानक 

'दम लगाके हईशा' मध्ये आयुषमान खुरानाने प्रेम नावाच्या युवकाची भूमिका साकारली आहे. ज्याचं  प्रेम संध्या नावाच्या एका मुलीशी लग्न लावून दिलं जातं, जी एक सुशिक्षित असते पण शरीरयष्टीने थोडी जाड असते. त्यामुळे प्रेम हा आपल्या वैवाहिक आयुष्यात फारसा आनंदी नसतो. यामुळे दोघांमधील दुरावा वाढतो आणि अखेरीस गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचते. याचदरम्यान, कथेत एक ट्विस्ट येतो जो पाहण्यासारखा आहे. 'दम लगा के हईशा' ही हरिद्वारमधील एका जोडप्याची अतिशय गोड कथा आहे.

आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांचा 'दम लगा के हईशा' रोमँटिक कॉमेडी चित्रपट आता Netflix वर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे.हा चित्रपट शरत कटारिया यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Haridwar couple's unique love story trends on OTT after 11 years.

Web Summary : Ayushmann Khurrana and Bhumi Pednekar's 'Dum Laga Ke Haishya', a romantic comedy about an unlikely couple in Haridwar, is trending on Netflix. The film explores their journey from a forced marriage to finding love amidst societal expectations and personal insecurities. It's a sweet tale of acceptance and self-discovery.
टॅग्स :आयुषमान खुराणाभूमी पेडणेकर बॉलिवूडसिनेमा