Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्विंकल खन्नाचं एक पाऊल पुढे, थेट लंडनहून येतायंत ऑक्सिजन सिलेंडर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 14:18 IST

रुग्णांना योग्य वेळेत ऑक्सिजन बेड, इंजेक्शन आणि उपचार मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या विदारक परिस्थितीत आता कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अभिनेत्री ट्विंकल खन्नाही पुढे आली आली आहे.

भारतात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांना योग्य वेळेत ऑक्सिजन बेड, इंजेक्शन आणि उपचार मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या विदारक परिस्थितीत आता कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अभिनेत्री ट्विंकल खन्नाही पुढे आली आली आहे. ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. यात तिने अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली आहे. जे रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवतात. मी त्यांना थेट लंडनवरुन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करेन. असे ट्विट ट्विंकलने केलं आहे.

ट्विंकल खन्नाने पती अक्षयकुमारच्या पावलावर पाऊल टाकत मदतीचा भाव जपला आहे. कोरोना महामारीच्या काळात देशावरील हे संकट आपलं संकट असल्याचं दाखवून दिलंय. ट्विंकलच्या या संवेदनशील स्वभावाचं सोशल मीडियातून कौतुक होत आहे. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊन दरम्यान अक्षय कुमारने  पीएम केअर फंडला 25 कोटींची मदत केली होती. काही दिवसांपूर्वी खिलाडी कुमारलाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यावर अवघ्या नऊ दिवसांत मात करत अक्षय घरी परतला होता. याची माहिती देखील सोशल मीडियावर ट्विंकल खन्नाने दिली होती. 

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमार