Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shahrukh Khan : मग नावापुढे ‘खान’ का लावतो? वाचा, चाहत्याचा प्रश्न अन् शाहरूख खानचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:58 IST

Shahrukh Khan : शाहरूख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अर्थात रिलीजआधीच या सिनेमानं वाद ओढवून घेतला आहे. पण शाहरूख मात्र ‘पठाण’ हिट करण्याच्या तयारीला लागला आहे...

शाहरूख खानचा (Shahrukh Khan ) ‘पठाण’ (Pathaan ) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अर्थात रिलीजआधीच या सिनेमानं वाद ओढवून घेतला आहे. ‘बेशरम रंग’या गाण्यावरून वातावरण तापलं आहे. चित्रपट बायकॉट करण्याची मागणी होत आहेत. पण शाहरूख मात्र ‘पठाण’ हिट करण्याच्या तयारीला लागला आहे. त्याने सिनेमाचं जबरदस्त प्रमोशन चालवलं आहे.  याच प्रयत्नाचा भाग म्हणजे, #ASKSRK  हे सेशन. होय, गेल्या काही दिवसांत ट्विटरवर #ASKSRK ट्रेंड सुरू आहे. यात शाहरूख चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो. नुकतंच त्याने चाहत्यांसाठी हे सेशन ठेवलं. मग काय चाहत्यांचे एक ना अनेक प्रश्न आणि शाहरूखची उत्तरं... असा ‘सिलसिला’ रंगला.

याचदरम्यान एका चाहत्याने शाहरूखला त्याच्या ‘खान’ या आडनावाबद्दल प्रश्न विचारला. ‘तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी ही काश्मिरी आहे ना? तरी तुम्ही तुमच्या नावाबरोबर खान का जोडता?,’ असा प्रश्न या चाहत्याने केला.

यावर शाहरूखने त्याच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं. ‘संपूर्ण जग हे माझं कुटुंब आहे. कुटुंबाच्या नावामुळे तुमचं नाव मोठं होत नाही, तुमच्या कामामुळे तुमचं नाव होतं, कृपया अशा संकुचित विचारात अडकू नका....,’ असं शाहरूख या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाला. त्याच्या या उत्तरानं अनेकांची मनं जिंकली.

‘पठाण’ पाहायचा कशासाठी? असा प्रश्न एका चाहत्याने केला. यावर, ‘अरे देवा, आयुष्याचा उद्देश काय? प्रत्येक गोष्टीमागे तरी काय उद्देश असतो? माफ करा, पण मी इतका खोलवर विचार करत नाही...,’ असं उत्तर शाहरूखने दिलं.

‘पठाण’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर, शाहरूखचे चाहते या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. येत्या 25 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. येत्या 10 तारखेला सिनेमाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर रिलीज होतोय.  

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमाबॉलिवूड