Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तेव्हा मला मोक्ष प्राप्त होईल…", आशा भोसले यांची 'ती' पोस्ट ठरली शेवटची, नेमकं काय म्हणालेल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:41 IST

आशा भोसले यांची अखेरची पोस्ट व्हायरल; वाचून डोळे पाणावतील

Asha Bhosle Last Post: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. वयाच्या १० व्या वर्षी (१९४३ मध्ये) 'माझा बाळ' या मराठी चित्रपटातून गायनाला सुरुवात केली.आशा भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीत एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे.अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. नाच रे मोरा, आईए मेहेरबाँ, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहाँ पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश... हा आवाकाच अविश्वसनीय आहे. 

आशा भोसले या  सोशल मीडियावर देखील सक्रिय होत्या. त्या  कायमच विविध पोस्ट शेअर करत त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत असत. अनेकदा तत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही आठवणी देखील शेअर करत असत. 

आशा भोसले यांची तीन आठवड्यांपूर्वीची 'ती' पोस्ट ठरली अखेरची...

दरम्यान, आशा भोसले यांनी तीन आठवड्यांपूर्वी इनस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आपलं गाणं 'द शेडोई लाइट'सोबत आयुष्य आणि मोक्ष याबाबत लिहिलेलं पाहायला मिळतंय. तसेच या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, आशा भोसले यांनी आंतरराष्ट्रीय बँड ‘गोरिलाझ’सोबतचा एक फोटो शेअर केला होता.इंस्टाग्राम पोस्टमध्ये, आशा भोसले यांनी आंतरराष्ट्रीय बँड ‘गोरिलाझ’सोबतचा एक फोटो शेअर केला होता. या  फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय वस्ती, हत्ती आणि  काहीजीर्ण झालेल्या वस्तूंची दृश्य  दिसत आहेत. या पोस्टला भलंमोठं कॅप्शन देत आशाताईंनी लिहिलंय, त्यामध्ये त्यांनी लिहिलंय, “द शॅडॉई लाईट’ हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. वाराणसीला जाऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठावरून प्रवास करून, मी जे पाहिलं ते बारकाईने समजून घेतल्यावर, मला जीवनाचा अर्थ कळला. मी कोण आहे? आणि या पृथ्वीवर मला काय करायचे आहे? हे मला समजलं.” असं त्यांनी लिहीलं.‘द शॅडोई लाईट’ या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी आपला संपूर्ण वारसा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय,‘द शॅडोई लाईट’वर, या खोल नदीच्या पैलतीरी जाणं हे माझ्या आयुष्याच्या प्रवासाचं प्रतीक आहे. माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रती असलेली माझी निष्ठा, माझं कर्त्तुत्व आणि एक मुलगी, आई, बहीण, पत्नी व एक हिंदू, भारतीय म्हणून माझी कर्तव्ये आहेत.जेव्हा मी त्या पैलतीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल, आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन.जेव्हा त्यामधील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सूर निर्माण होतात. त्याचप्रमाणे, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद, जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल."  या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आपल्या संगीत साधनेचं वर्णन, हे जीवनाची नदी पार करण्यास मदत करणाऱ्या नावाड्यासमान केलं.

 सूरसम्राज्ञी आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांचं काल  १२ एप्रिल  २०२६ रोजी निधन झालं.आज सोमवारी सकाळी साडेदहा ते दुपारी २ वाजेपर्यंत लोअर परळ येथील कासा ग्रँड येथे आशा ताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणआर आहे. तर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle's last post: 'Then I will achieve salvation...'

Web Summary : Asha Bhosle's death has saddened the nation. Her last Instagram post, three weeks prior, reflected on life, music, and achieving 'moksha' (salvation) through her art, envisioning her voice merging into a beautiful song. She passed away on April 12, 2026.
टॅग्स :आशा भोसलेबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया