Join us

लग्नाच्या अडीच वर्षांतच मोडले या अभिनेत्याचे लग्न, नाते संपवण्यातच दोघांचे भले अशी केली सोशल मीडियावर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 17:42 IST

लग्न मोडले असल्याचे या अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले आहे. आपण वेगळे होण्यातच दोघांचेही भले असल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

ठळक मुद्देअरुणोदयने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत लिहिले आहे की, मी काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. मी सोशल मीडियावर पोस्ट न टाकण्यामागे एक खास कारण आहे. आमच्या नात्यात आता दुरावा आला असून आमचे लग्न मोडण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

अरुणोदय सिंगने जिस्म २, उंगली, डॉन ३ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या लग्नाला केवळ अडीच वर्षं झाले असून त्याच्या पत्नीने आणि त्याने आता वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे. त्याने ली एल्टनसोबत लग्न केले होते. या दोघांचे लग्न मोडले असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. 

ली आणि अरुणोदय सिंग यांनी २०१६ च्या डिसेंबरमध्ये लग्न केले होते. ली ही मुळची कॅनडाची असून ती गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात राहाते. गोव्यातील एका प्रसिद्ध कॅफेची ती मालकिण असून ती प्रसिद्ध शेफ देखील आहे. अरुणोदय आणि ली यांनी अडीज वर्षांच्या नात्यानंतर लग्न केले होते.

अरुणोदयने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत लिहिले आहे की, मी काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. मी सोशल मीडियावर पोस्ट न टाकण्यामागे एक खास कारण आहे. आमच्या नात्यात आता दुरावा आला असून आमचे लग्न मोडण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलो होतो. पण आता आम्ही एकमेकांसोबत राहूच शकत नाही असे आम्हाला दोघांनाही वाटते. आम्ही आमचे नाते वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही काऊन्सिलरची देखील मदत घेतली. तसेच ट्रायल सेपरेशन देखील करून पाहिले. पण हे सगळे करून देखील आमच्यातील मतभेद काही दूर झाले नाहीत. त्याचमुळे आता आम्ही दोघांनी मिळून वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही आयुष्यात यापेक्षा चांगल्या गोष्टी डिझर्व्ह करतो असे आम्हाला वाटत असल्याने आम्ही आमचे नाते इथेच संपण्याचे ठरवले आहे. आमच्या आयुष्यात आलेल्या या प्रसंगाला आम्ही खंबीरपणे सामोरे जात आहोत. 

अरुणोदय हा अभिनय क्षेत्रात असला तरी त्याचे वडील, आजोबा हे राजकारणात आहेत. त्याला अभिनयाची आवड असल्याने शालेय जीवनापासूनच तो नाटकांमध्ये काम करत होता. त्याने सिकंदर या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

टॅग्स :बॉलिवूड