Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन रामपालच्या लेकीला पाहिलंत का? फॅशन-स्टाईलने बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 13:08 IST

सुपरहँडसम अर्जुनची लेक एकाएकी चर्चेत आली आहे.

अभिनेता अर्जुन रामपाल हा चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तो दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये आहे आणि त्याचे खूप चाहते आहेत. अशातच सुपरहँडसम अर्जुनची लेक एकाएकी चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही फोटो. 

अर्जुन रामपाल आणि त्याची पहिली पत्नी मेहर जेसिया यांची मोठी मुलगी माहिका रामपाल सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. नुकतेच ती रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मॉल जिओ वर्ल्ड प्लाझाच्या लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली होती. या लॉन्च इव्हेंटमध्ये माहिका रामपाल ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. 

डीप लो कट नेक असलेल्या रॉय ब्लू ड्रेसमध्ये माहिका रामपाल खूपच सुंदर दिसत होती. यावेळी माहिका रामपालचा लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. एकिकडे तिच्या रुपानं सर्वजण घायाळ झालेले असतानाच दुसरीकडे तिच्या बॉलिवूड पदार्पणाची मात्र कोणतीही चर्चा नाही.   

अर्जुन रामपालने पहिले लग्न सुपरमॉडेल मेहर जेसियाशी केले होते. दोघांना मिहिका रामपाल आणि मायरा रामपाल या दोन मुली आहेत.  दोन्ही मुलींवर त्याचा विशेष जीव आहे. 21 वर्षांच्या लग्नानंतर अर्जुन आणि मेहर यांचा 2019 मध्ये घटस्फोट झाला. सध्या अर्जुन हा गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत रिलेशनशीपमध्ये आहे. गेल्या 20 जुलैला त्यांनी  दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. या दोघांना आधी एक मुलगा आहे. 

टॅग्स :अर्जुन रामपालबॉलिवूडसेलिब्रिटी