Join us

मुंह तो बंद करो अंकल! मलायका अरोराने केला असा डान्स की अर्जुन कपूर Ex गर्लफ्रेंडकडे पाहतच राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:33 IST

मलायका अरोराने केला असा डान्स की अर्जुन कपूर पाहतच राहिला, अभिनेत्याची बोलतीच बंद

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बी टाऊनमधील लोकप्रिय कपल होतं. पण, काही महिन्यांपूर्वीच अर्जून-मलायकाचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच दोघं एका कार्यक्रमात एकत्र दिसले. मलायका अरोरा परिक्षक असलेल्या डान्स रिएलिटी शोमध्ये अर्जुन कपूरने हजेरी लावली होती.  या रिएलिटी शोमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

इंडियाज बेस्ट डान्सर vs सुपर डान्सर या रिएलिटी शोमध्ये अर्जुन कपूर त्याच्या आगामी मेरे हसबंड की बीवी या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकरदेखील होती. या शोमध्ये मलायका अरोरा परिक्षक आहे. या शोमधील प्रोमो समोर आला आहे. यामध्ये मलायका अरोरा तिच्या आयकॉनिक गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. मलायकाचा डान्स पाहून अर्जुन कपूरसोबतच भूमी पेडणेकरही थक्क होते. 

अर्जुनला मलायकाच्या डान्सबाबत प्रतिक्रिया विचारली जाते. "गेल्या काही वर्षांपासून माझी बोलतीच बंद झाली आहे. मी आताही गप्पच राहणं पसंत करेन. पण, मला माझी सगळी आवडती गाणी ऐकण्याची संधी मिळाली. जी तिच्या करिअरमधली बेस्ट आहेत", असं अर्जुन म्हणाला. "ज्या प्रकारचं म्युझिक आणि परफॉर्मन्स होता. आपण एका अशा महिलेला प्रोत्साहन देत आहोत जी अजूनही चांगलं काम करत आहे. मलायका तुलाही माहीत आहे मला ही गाणी किती आवडतात. तुला डान्स करताना पाहून छान वाटलं", असंही पुढे अर्जुन म्हणत असल्याचं दिसत आहे. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर