बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंहने नुकतीच चित्रपट संगीतातून (Playback Singing) निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे त्याचे चाहते भावूक झाले आहेत. या घोषणेनंतर अरिजीतच्या आवाजातील 'O Romeo' या आगामी चित्रपटातील 'इश्क का फिव्हर' हे रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. विशाल भारद्वाज यांच्या संगीताने सजलेले हे गाणे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अरिजीतचे नवीन गाणे चाहत्यांच्या भेटीस
विशाल भारद्वाज यांचे संगीत आणि दिग्गज गीतकार गुलजार यांचे शब्द असा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. विशाल भारद्वाज यांनी सोशल मीडियावर या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक भावूक व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी अरिजीतला आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंतीही केली आहे. "अरिजीत, काही दिवसांपूर्वी आपण हे गाणे रेकॉर्ड करत होतो, तेव्हा मला माहित नव्हते की हे तुझे शेवटचे गाणे असेल. तुझा 'संन्यास' आम्हाला मान्य नाही," अशा आशयाची पोस्ट विशाल यांनी लिहिली होती.
या गाण्यात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची फ्रेश जोडी पाहायला मिळत आहे. दोघांमधील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेले हे गाणे प्रेमाचा नवा मंत्र ठरत आहे. गाण्याची सुरुवात अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या एका प्रभावी संवादाने होते, जे गाण्याला अधिक अर्थपूर्ण बनवते.
अरिजीत सिंहने २७ जानेवारी रोजी निवृत्तीची घोषणा करताना सांगितले होते. 'इश्क का फिव्हर' हे गाणे त्याच्या शेवटच्या काही गाण्यांपैकी एक असल्याने चाहत्यांनी कमेंट्समध्ये "आम्ही तुला मिस करू" (We will miss you) अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
विशाल भारद्वाज दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मित 'O Romeo' हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद आणि तृप्तीसोबतच नाना पाटेकर, अविनाश तिवारी आणि तमन्ना भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'इश्क का फिव्हर' गाण्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढवली आहे.
Web Summary : Arijit Singh's 'Ishq Ka Fever' from 'O Romeo' is out after his retirement announcement. Vishal Bhardwaj requested him to reconsider. Fans express missing him. The film releases February 13, 2026.
Web Summary : अरिजीत सिंह का गाना 'इश्क का फीवर' फिल्म 'ओ रोमियो' से संन्यास की घोषणा के बाद रिलीज़ हुआ। विशाल भारद्वाज ने उनसे पुनर्विचार करने का अनुरोध किया। प्रशंसक उन्हें याद करते हैं। फिल्म 13 फरवरी, 2026 को रिलीज़ होगी।