Join us

लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:46 IST

कपिल शर्मा शोमधून भेटीला येणाऱ्या आणि सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार अशा चर्चा आहेत.

मनोरंजन विश्वात अनेक कलाकार सुखी संसार अनुभवत असतात. तर काही कलाकारांच्या नात्यात मात्र दुरावा निर्माण होऊन गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. घटस्फोटाची अशीच एक चर्चा सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सुरु आहे. ही अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरण सिंग. कपिल शर्मा शोमध्ये ज्यांच्या हास्याने शोची रंगत अजून वाढते त्या अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरण सिंग. अभिनेत्रीचे पती परमीत सेठी (parmeet sethi) सुद्धा लोकप्रिय अभिनेते आहेत. अर्चना (archana puran singh) आणि परमीत एकमेकांशी घटस्फोट घेणार, अशी चर्चा सुरु आहे. याविषयी अर्चना यांनी मौन सोडलंय. 

घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाल्या अर्चना?

अर्चना यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून अर्चना यांच्या एका चाहत्याने परमीत आणि त्यांच्या नात्याबद्दल काळजी व्यक्त केली. त्यावर अर्चना म्हणाल्या, "आमचं भांडण एकदम नॉर्मल होतं. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करतो. त्यावर वाद करतो. पण त्यामुळे आमच्या नात्यात कोणत्याही प्रकारचा तणाव नाही", अशा शब्दात अर्चना पूरण सिंग यांनी घटस्फोटांच्या चर्चांवर मौन सोडलं. 

खूप कमी लोकांना माहित असेल की, अर्चना आणि परमीत यांनी ३० जून १९९२ रोजी गुपचुप लग्न केलं होतं. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. एका मंदिरात दोघांनी लग्नगाठ बांधली होती. पुढे करिअरच्या भीतीने दोघांनी अनेक वर्ष त्यांचं लग्न इंडस्ट्रीपासून लपवून ठेवलं. परंतु नंतर मात्र परमीत आणि अर्चनाने लग्नाचा खुलासा केला. परमीत-अर्चना यांना दोन मुलं आहेत. अर्चना युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असतात.

टॅग्स :अर्चना पूरण सिंगबॉलिवूडकपिल शर्मा परमीत सेठीघटस्फोट