Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मैदान'च्या स्क्रीनिंगमधून अर्चना गौतमला हाताला धरुन थेट बाहेर काढलं, नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:15 IST

स्क्रीनिंगआधी पापाराझींना पोज देत असताना अर्चना गौतमला मात्र महिला सुरक्षाकर्मीने बाहेर काढलं.

अजय देवगणचा 'मैदान' सिनेमा उद्या रिलीज होत आहे. यामध्ये त्याने फुटबॉल कोचची भूमिका साकारली. सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. कालच सिनेमाची स्क्रीनिंग पार पडली. यावेळी मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बोनी कपूर यांनी सिनेमाची निर्मिती केली असल्याने जान्हवी कपूर, अर्जुन कपूरही स्क्रीनिंगसाठी पोहोचले. तर बिग बॉस फेम मन्नारा चोप्रा, अर्चना गौतम यांचीही हजेरी होती. स्क्रीनिंगआधी पापाराझींना पोज देत असताना अर्चना गौतमला (Archana Gautam) मात्र महिला सुरक्षाकर्मीने बाहेर काढलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामागचं कारणही समोर आलं आहे.

अजय देवगणच्या 'मैदान' सिनेमाचं स्क्रीनिंग काल उत्साहात पार पडलं. 'बिग बॉस 16' फेम अर्चना गौतमही इव्हेंटसाठी पोहोचली. पांढरा क्रॉप टॉप, निळ्या रंगाची शॉट्स, स्पोर्ट्स शूज  अशा लूकमध्ये ती आली. कॅमेऱ्यासमोर पोज देत असतानाच एक महिला सुरक्षारक्षक आली आणि तिने अर्चनाला हाताला धरुन बाहेर नेलं. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला की अशा पद्धतीने अर्चनाला का बाहेर नेलं जात आहे असा प्रश्न पापाराझींनाही पडला. अर्चनाला आमंत्रणच नव्हतं का अशीही चर्चा सुरु झाली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. voompla ने व्हिडिओ पोस्ट केला आहे.

अर्चनाला नक्की का बाहेर काढण्यात आलं याचं कारण समोर

मैदान स्क्रीनिंगवेळी सर्व आमंत्रितांना एक विशिष्ट प्रकारचा बँड देण्यात आला होता. हा बँड दाखवूनच सेलिब्रिटींना थिएटरमध्ये प्रवेश होता. पण अर्चना बिना बँडचीच पापाराझींसमोर पोज देत होती. त्यामुळे महिला सुरक्षारक्षकाने तिला बाहेर नेले. नंतर तिला बँड देऊनच एन्ट्री दिली गेली. 

अर्चना गौतम 'बिग बॉस 16' मुळे चर्चेत आली. बिग बॉसमध्ये  शिव ठाकरेच्या मंडलीचा तीही भाग होती. यानंतर ती 'खतरो के खिलाडी' मध्येही सहभागी झाली. मात्र आता अर्चनाकडे काम नाही का अशी चर्चा आहे. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीसोशल मीडियाट्रोल