Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:41 IST

खान कुटुंबात येणार छोटा पाहुणा

दिग्दर्शक, अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अरबाजची दुसरी पत्नी शूरा खान (Sshura Khan) प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. आता नुकताच शूराचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसतोय. त्यामुळे अरबाज वयाच्या ५७ व्या वर्षी बाबा होणार ही बातमी कन्फर्म आहे. याआधी अरबाजला पहिली पत्नी मलायकापासून २२ वर्षांचा अरहान हा मुलगाही आहे.

अरबाज खानने २०२३ साली शूरासोबत लग्न केलं. २०१७ साली अरबाज मलायकाचा घटस्फोट झाला होता. यानंतर अरबाजला ६ वर्षांनी पुन्हा प्रेम मिळालं. शूरा ही रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट होती. तेव्हाच अरबाज आणि  शूराची ओळख झाली होती. दोघांनी मित्रपरिवाराच्या उपस्थित रजिस्टर मॅरेज केलं होतं. तेव्हा अरबाज ५५ वर्षांचा होता. या वयात पुन्हा लग्न केल्याने तो ट्रोलही झाला होता. तर आता शूराने लग्नानंतर दोन वर्षात गुडन्यूज दिली आहे. नुकतीच ती मुंबईतील एका दुकानातून बाहेर येताना दिसली. तिने स्किन टाईट वनपीस परिधान केला आहे. तर वर डेनिम जॅकेट घातलं आहे. शूराच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद स्पष्ट दिसून येतोय. तसंच तिच्या बेबी बंपनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शूराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शूरा खानचंही हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पतीपासून तिला आधीच एक मुलगी आहे. आता लवकरच खान कुटुंबात आणखी एक छोटा पाहुणा येणार आहे. अद्याप अरबाज किंवा शूराने यावर भाष्य केलेलं नाही. मात्र शूराच्या व्हिडिओंमधून तिच्या बेबी बंपवरुन आता ही गुडन्यूज समोर आली आहे.

टॅग्स :अरबाज खानबॉलिवूडप्रेग्नंसी