Join us  

गॅलेक्सीत येणार स्पेशल गेस्ट!! गर्लफ्रेन्ड जॉर्जियाच्या कुटुंबाला अरबाज खानचे खास निमंत्रण !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 6:01 PM

मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान सध्या जॉर्जिया एंड्रियानीच्या प्रेमात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात अरबाज व जॉर्जियाच्या प्रेमाची चर्चा रंगत होती. पण आताश: दोघांनीही हे नाते जगजाहिर केले आहे. 

मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान सध्या जॉर्जिया एंड्रियानीच्या प्रेमात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात अरबाज व जॉर्जियाच्या प्रेमाची चर्चा रंगत होती. पण आताश: दोघांनीही हे नाते जगजाहिर केले आहे. अलीकडे दोघेही ‘खुल्लम खुल्ला’ फिरताना दिसतात. काल-परवा एका इव्हेंटमध्ये मीडियासमोरही अरबाज व जॉर्जिया असेच बिनधास्तपणे वावरताना दिसले. आता एक ताजी खबर खरी मानाल तर, अरबाज जॉर्जियाबद्दल एक मोठा निर्णय घेऊ शकतो. होय, जॉर्जियाच्या कुटुंबाला भेटण्याची तयारी अरबाजने सुरु केली आहे. जॉर्जियाचे कुटुंब लवकरच अरबाज व त्याच्या कुटुंबीयांना भेटायला मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये येणार आहे. या भेटीत सगळे काही सुरळीत झाले तर अरबाज व जॉर्जिया लवकरच आपल्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा करू शकतात.सलमानच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव थाटात साजरा होतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्जियाच्या कुटुंबाला या उत्सवात सामील होण्याचे खास निमंत्रण देण्यात आले आहे. अरबाज जॉर्जियाला बॉलिवूडमध्ये संधी देणार, अशीही मध्यंतरी खबर होती. आता ही बातमी किती खरी, किती खोटी ते आम्हाला ठाऊक नाही. पण अरबाज जॉर्जियाबद्दल सीरिअस असल्याचे मात्र दिसतेय.

गत ४ आॅगस्टला अरबाजने आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत अरबाजने जॉर्जियासोबतचे नाते जगजाहिर केले, असे मानले जाते. या पार्टीत अरबाजची एक्स-वाईफ मलायकाही सामील झाली होती. त्यामुळे तिला अरबाजच्या या नव्या नात्याबद्दल काहीही आक्षेप नाही, हे उघडचं आहे.अरबाज खानसध्या त्याच्या आगामी ‘दबंग-३’च्या तयारीला लागला आहे. ‘भारत’नंतर सलमान ‘दबंग-३’चे शूटिंग करणार आहे. आतापर्यंत आलेले ‘दबंग’च्या सिरीज हिट झाल्या आहेत. सलमानच्या अपोझिट कोण झळकणार हे अद्याप कळलेले नाही.   या सिनेमाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे.  

टॅग्स :अरबाज खानमलायका अरोरा