Join us

नोरा फतेहीच्या 'दिलबर' गाण्याचं अरेबिक व्हर्जन, पहा हे गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 20:09 IST

नोरा फतेहीचे अरेबिक व्हर्जनमधील 'दिलबर' हे गाणे नुकतेच दाखल झाले असून या गाण्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

ठळक मुद्देनोराच्या 'दिलबर' गाण्याचे अरेबिक व्हर्जन

'सत्यमेव जयते' चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील 'दिलबर' हे गाणे खूप हिट झाले. या गाण्यावर नोरा फतेही थिरकली होती. या गाण्याला मिळालेला प्रतिसाद पाहून या गाण्याचा अरेबिक व्हर्जन आणण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे आणि या गाण्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या गाण्यातही नोराने खूप चांगला बेली डान्स केला आहे. 

नोराने 'सत्यमेव जयते' चित्रपटातील 'दिलबर' गाण्यावरील दमदार डान्सने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर आता हे अरेबिक व्हर्जन दाखल झाले आहे. हे गाणे टी सीरिजने प्रदर्शित केले असून या गाण्याची निर्मिती नोरा फतेहीने केली आहे. हे गाणे मोरक्कन अाफ्रीकी बँडच्या सहकार्याने बनवण्यात आले आहे. बऱ्याच कालावधीपासून हे गाणे चर्चेत होते आणि नोरा फतेही या गाण्यासाठी खूप मेहनत घेत होती.

याबाबत नोरा एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'हा प्रोजेक्ट मोरक्को व भारत दोन्ही देशांसाठी मोठी बाब आहे कारण यातून दोन्ही देशातील संस्कृतीची देवाणघेवाण होणार आहे.''दिलबर' अरेबिक व्हर्जनला स्वतः नोराने स्वरसाज दिला आहे. या गाण्यातून नोराचा आणखीन एक टॅलेंट जगासमोर आले आहे. नोराचे हे गाणेदेखील तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल, यात शंका नाही.

टॅग्स :नोरा फतेही