Join us

अनुष्का-विराटने दुसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी लंडन का निवडलं? मोठं कारण समोर आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:20 IST

अनुष्काची डिलिव्हरी भारतात नाही तर विदेशात झाली आहे. विराट

क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना 15 फेब्रुवारी 2024 रोजी पुत्ररत्न प्राप्त झालं आहे.  बाळाच्या जन्माच्या पाच दिवसांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली. विरुष्काला पुत्ररत्न प्राप्त झाल्याने एकीकडे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही चाहते मात्र पाच दिवसांनी गुडन्यूज शेअर केल्याने नाराज झाले आहेत. शिवाय, अनुष्काची डिलिव्हरी भारतात नाही तर विदेशात झाली आहे. विराट-अनुष्काने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी भारतामधील एखादे शहर नाही तर लंडन निवडलं. पण, त्यांनी हा निर्णय का घेतला या मागचं कारण समोर आलं आहे. 

अनुष्का शर्मा काही काळापासून गर्भवती असल्याच्या बातम्या येत होत्या. दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्यापासून ते मुलाच्या जन्मापर्यंत विराट-अनुष्काने गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली होती. डीएनएनच्या अहवालात म्हटलं आहे की जोडप्याला गोपनीयता हवी होती. पापाराझींनी वारंवार नकार देऊनही वामिकाचा फोटो अनेक वेळा क्लिक करण्यात आला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण, विराट-अनुष्काला दुसऱ्या बाळाबाबत पुर्ण गोपनीयता हवी होती, यासाठी त्यांनी मुंबईपासून दूर लंडनची निवड केली.

दुसरे कारण असेही सांगितले जात आहे की या जोडप्याला यूकेला शिफ्ट व्हायचं आहे. लंडनला आपलं दुसरे घर बनवायचा विचार ते करत आहे. त्यांना युकेचे नागरिकत्व हवे आहे, त्यासाठी त्यांनी लंडनमध्ये प्रसूती करणं योग्य मानलं. दरम्यान यावर विराट-अनुष्काने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दरम्यान विराट आणि अनुष्काने 11 जानेवारी 2021 रोजी वामिकाला जन्म दिला होता. तीन वर्षीय वामिका आता मोठी बहीण झाली आहे. 

विराट व अनुष्काने काही वर्षे डेटिंग केल्यानंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती. अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती 'चकडा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट माजी भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित आहे. ती शेवटची २०१८ मध्ये आनंद एल राय यांच्या रोमँटिक ड्रामा ‘झिरो’मध्ये झळकली होती.

टॅग्स :अनुष्का शर्मासेलिब्रिटीबॉलिवूड