Join us

OMG : कॅटरिना कैफच्या पार्टीतून 10व्या मिनिटालाच अनुष्का शर्मानं घेतला काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 19:29 IST

सध्या बॉलिवूडवर ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचा फिव्हर आहे. नुकतीच कॅटरिना कैफने आपल्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी-टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

ठळक मुद्दे कॅटच्या झिरो सिनेमाची संपूर्ण टीम या पार्टी हजर होतीपार्टी सुरु होऊन काही मिनिटं झाली असतानाच अनुष्का शर्माने या पार्टीतून काढता पाय घेतला

सध्या बॉलिवूडवर ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचा फिव्हर आहे. नुकतीच कॅटरिना कैफने आपल्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी-टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. कॅटच्या झिरो सिनेमाची संपूर्ण टीम या पार्टी हजर होती. पार्टी सुरु होऊन काही मिनिटं झाली असतानाच अनुष्का शर्माने या पार्टीतून काढता पाय घेतला. अनुष्का अवघ्या 10 मिनिटातून पार्टीतून निघून गेली होती. होय, तुम्ही बरोबर वाचलात अनुष्का 10 व्या मिनिटानंतर निघून गेली. पार्टी सकाळपर्यंत चालू होती मात्र नेमक मग अस काय घडले ज्यामुळे अनुष्का ऐवढ्या लवकरच पार्टी सोडून गेली. 

त्याचे झाले असे की अनुष्का आपला पती विराट कोहलीला भेटण्यासाठी भारतातून मेलर्बनला रवाना झाली आहे. सध्या भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मेलर्बनमध्ये होणारी तिसरी टेस्ट मॅच पाहण्यासाठी अनुष्का गेली आहे. विराटच्या करिअरमधील ही मॅच महत्त्वाची असल्याने अनुष्का त्या ठिकाणी गेल्याची माहिती समोर येते आहे. 

अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ आणि शाहरुख खान यांच्या झिरो सिनेमाचे बजेट २०० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात होते. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. शाहरुख खान यात एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिका साकारली होती. या सिनेमातून शाहरुखच्या चाहत्यांना  बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र शाहरुखने त्यांची निराशा केली असेच म्हणावे लागले. 

टॅग्स :अनुष्का शर्माझिरो सिनेमाशाहरुख खानकतरिना कैफ