Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का शर्मा, 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 17:13 IST

नुकतेच अनुष्का मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिने काळ्या रंगाचे ओव्हरसाईज जॅकेट घातले होते.

अभिनेत्री बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा  प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दिवाळीमध्ये अनुष्काचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसून येत होता. मात्र, तिने अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आता तिचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने बेबी बंप लपवला आहे.

नुकतेच अनुष्का मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिने काळ्या रंगाचे ओव्हरसाईज जॅकेट घातले होते.  या व्हिडिओमध्ये अनुष्का बेबी बंप लपवत असल्याचं नेटकरी म्हणत आहे. त्यामुळे तिच्या गरोदरपणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.  विरुष्का लवकरच ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर करू शकतात.

विराट आणि अनुष्काने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नाच्या चार वर्षांनी अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या लेकीचं नाव वामिका आहे. विराट-अनुष्का त्यांच्या लेकीला माध्यमांपासून दूर ठेवतात. त्यांनी सोशल मीडियावरही तिचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनुष्का पुढे स्पोर्ट्स बायोपिक 'चकदा एक्सप्रेस' मध्ये दिसणार आहे. प्रोसित रॉय दिग्दर्शित हा बायोपिक क्रिकेटर झुलन गोस्वामीवर आधारित आहे. ती अखेरीस  शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत झिरो या चित्रपटात दिसली होती.

टॅग्स :अनुष्का शर्माबॉलिवूडसेलिब्रिटीविराट कोहली