Join us

वो 15 लाख... उन्ही को जोड जोड के यह पॅकेज बनाया...! अनुराग कश्यपचा मोदींना टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 12:49 IST

पण एक गोष्ट अगदी बरोबर बोललात प्रभु....

ठळक मुद्देअनुरागच्या या दोन्ही पोस्ट क्षणात व्हायरल झाल्यात आणि यावरही अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

कोरोना आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला आणि यादरम्यान २० लाख कोटींच्या   आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज भारताच्या एकूण सकल उत्पन्नाच्या 10 टक्के इतके आहे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. मोदींनी या पॅकेजची घोषणा करताच, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा जणू पाऊस पडला. यातील बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची प्रतिक्रिया अधिक लक्षवेधी ठरली. यानिमित्ताने अनुरागने पुन्हा एकदा मोदींवर खोचक टीका केली.

‘ जे 15 लाख देशवासीयांच्या खात्यात पोहोचले नाहीत, तेच जोडून हे पॅकेज बनवले आहे. गेल्या सहा वर्षांपासून मोदीजींनी याच दिवसासाठी हे पैसे वाचवून ठेवले होते. आता हे पॅकेज आणखी वाढवले जाईल आणि बघता बघता आपण पाच अब्जांपर्यंत पोहोचू. याला म्हणतात दूरदृष्टी. इंग्रजांसाठी Visionary ।,’ असे ट्विट अनुरागने केले.  त्याचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले.

यानंतर त्याने पुन्हा एकद ट्विट केले. यातही त्याने मोदींवर उपहासात्मक टीका केली. ‘पण एक गोष्ट अगदी बरोबर बोललात प्रभु.... स्वावलंबी बना.. अन्यथा काहीही होणार नाही. प्रभुवर विसंबून राहिलात तर काहीही खरे नाही,’असे आपल्या या दुस-या ट्विटमध्ये त्याने लिहिले.

अनुरागच्या या दोन्ही पोस्ट क्षणात व्हायरल झाल्यात आणि यावरही अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी अनुरागची बाजू घेतली तर काहींनी नेहमीप्रमाणे यावरून अनुरागला ट्रोल केले.

 

टॅग्स :अनुराग कश्यपनरेंद्र मोदी