अनुराग कश्यप हा भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक. अनुरागने विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांंचं मन जिंकलंय. अशातच क्रिकेटर विराट कोहलीवर अनुराग बायोपिक बनवणार का, अशी चर्चा होती. त्यामुळे विराट कोहलीच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच अनुरागने मात्र मी विराट कोहलीवर बायोपिक करणार नाही, असं ठाम विधान केलंय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाला अनुराग जाणून घ्या.अनुरागला करायचा नाही कोहलीचा बायोपिक, कारण...
फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीवर बायोपिक बनवणं तुला आवडेल का, असा प्रश्न दिग्दर्शक अनुराग कश्यपला विचारण्यात आला. त्यावेळी अनुरागने हे स्पष्ट केले आहे की, तो भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीवर बायोपिक बनवणार नाही. यामागचं कारण देताना अनुराग म्हणाला की, "विराट कोहली हा आधीच खूप लोकांचा, विशेषतः मुलांचा, आदर्श आहे. मला बायोपिक करायची असेल, तर मी एखादा कठीण विषय निवडेल. आणि एखाद्या अज्ञात व्यक्तीवर बायोपिक करेल." अशाप्रकारे अनुरागने त्याच्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या.