Join us

CAA: अनुराग कश्यपची मोदींवर जहरी टीका, पंतप्रधानांना म्हणाला मुका व बहिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 14:51 IST

अनुराग कश्यपने ट्विटरवर नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

देशात सर्वत्र सुधारित नागरिकत्व विधेयकावरुन सर्वत्र आंदोलन सुरु असतानाच आता याच मुद्यावर बॉलिवूडकर आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने देखील सोशल मीडियावर या मुद्द्यावर आपलं मत मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. अनुराग कश्यप म्हणाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनांच्या पलिकडे आहेत. 

अनुराग कश्यपने नरेंद्र मोदींवर जहरी टीका करत ट्विट केलं की, आमचे मुख्य सेवक, आमचे पंतप्रधान, जनतेचे मुख्य नोकर बहिरे व मुके आहेत आणि भावनांच्या पलिकडील आहेत. ते फक्त नौटंकी आहेत जे भाषण देऊ शकतात. बाकी सगळं त्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यांना ना दिसत आहे नाही ऐकू येत आहे. आता ते नवीन नवीन खोटं शिकण्यात व्यग्र आहेत.

यापूर्वीही अनुराग कश्यपने आरोप केला होता की सरकार समर्थक दंगे सुरु करतात आणि त्यानंतर जनतेवर पोलीस तुटून पडतात. देशातील सद्यस्थितीला भाजप सरकार जबाबदार असून, चिघळलेल्या परिस्थितीमागे भाजपचाच हात आहे, असाही आरोप अनुराग कश्यप यांनी केला.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नुकतेच संदसेत संमत करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे भारतालगतच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये असलेल्या मुस्लिमेत्तर अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकाला देशभरातून तीव्र विरोध होताना दिसत आहे. 

टॅग्स :अनुराग कश्यपनरेंद्र मोदी