Join us

"त्याने माझ्या मुलाखतीतला तो भाग काढून टाकला...", अनुपम खेर यांचा राज शमानीवर निशाणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:47 IST

अनुपम खेर झाले नाराज, नक्की काय घडलं?

सध्या पॉडकास्ट्सचा ट्रेंडच आला आहे. नुकतंच विजय मल्ल्याला आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवण्यात यशस्वी झालेला राज शमानी(Raj Shamani) सध्या खूप चर्चेत आहे. त्याने आजपर्यंत अनेक मोटिव्हेशल टॉक्स घेतले आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गजांची त्याने मुलाखत घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अनुपम खेरही (Anupam Kher) त्याच्या पॉडकास्टमध्ये आले होते. मात्र राज शमानीने नंतर एडिटमध्ये त्यांचं एक उत्तर काढून टाकल्याची तक्रार खेर यांनी नुकतीच एका मुलाखतीत केली. हे सांगताना त्यांनी नाव न घेता राज शमानीवर निशाना साधला.

'चलचित्र टॉक्स'ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, "मी नुकतंच एका पॉडकास्टमध्ये गेलो होतो. तिथे त्याने मला विचारलं की तुम्हाला मला काही सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? त्यानेच मला सल्ला द्यायला सांगितला मी नव्हतंच विचारलं. मी त्याला मोठा सल्ला दिला. तुझ्यात जे आता जे थोडे बदल होत आहेत ते मला दिसत आहेत. यशाचा अर्थ बदल नाही तर तुम्ही अजून नम्र झाला पाहिजेत. तू बोलताना नम्रता दाखवतोय पण तुझ्या ऑफिसचं वातावरण बदललेलं दिसत आहे. तू एका छोट्या गावातून आला आहेस. तर त्याने माझा हा सल्ला एडिट केला आणि पॉडकास्टमधून काढून टाकला. याचा अर्थ तो फेक आहे. आता तो जेव्हाही काही चांगलं बोलेल मला तर असंच वाटेल की हा तर खोटा माणूस आहे. यानेच मला सल्ला मागितला आणि त्याने तो भाग काढून टाकला."

याशिवाय खेर यांनी 'चलचित्र टॉक्स'मध्येही मुलाखत घेणाऱ्याची शाळा घेतली. ते म्हणाले,'तू माझा तन्वी द ग्रेट सिनेमा पाहिलास का? नाही पाहिलास ना...मी एक सांगतो. कोणाही पाहुण्याला पॉडकास्टमध्ये बोलवण्या अगोदर त्याचा लेटेस्ट सिनेमा बघणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या पाहुण्यासंबंधी पूर्ण अभ्यास करावा लागेल. त्याचा नवीन सिनेमा आला असेल तर तो बघावा लागेल. मगच त्यावर प्रश्न विचारा. नाहीतर बोलवून काय फायदा? आणि हो, हा भाग एडिट करु नको. फायनल कटमध्ये राहू देत. मी नंतर चेक करणार आहे'. असं सांगितल्यानंतर त्यांनी राज शमानीच्या पॉडकास्टचा तो किस्सा सांगितला.  

टॅग्स :अनुपम खेरसखी टॉक्सबॉलिवूड