Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुपम खेर यांनी केलं अनिल कपूर यांच्या 'तारुण्याचं रहस्य' उघड? सोशल मीडिया पोस्ट चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 19:07 IST

Anil Kapoor : अनिल कपूर त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतात. शिवाय, ते वयाची साठी उलटलेली असतानाही तरुण, डॅशिंग मॅन म्हणून नेहमीच चर्चेत असतात.

अनिल कपूर (Anil Kapoor) त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतात. शिवाय, ते वयाची साठी उलटलेली असतानाही तरुण, डॅशिंग आणि लेडीज मॅन म्हणून नेहमीच चर्चेत असतात. सहकलाकार आणि प्रिय मित्र अनुपम खेर यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांना चिडवणारी एक पोस्ट शेअर केली आहे आणि सोशल मीडिया या मजेशीर धम्मालचा आनंद घेत आहे.

अनुपम खेर यांनी या पोस्टला कॅप्शन दिले, "अरे #कपूरसाब! आप वही नहीं आप चाँद पे जा रहें हो? जोपर्यंत या मशीनचा तुमच्या प्रेमाशी काही संबंध नाही तोपर्यंत व्हिडिओमध्ये अनिल कपूर ऑक्सिजन थेरपी घेताना आणि थंब्स अप करताना दिसतात. अलीकडेच, अनिल कपूर यांनी इंस्टाग्रामवर जाऊन त्यांचा वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो -११० डिग्री सेल्सिअस तापमानात शर्टलेस व्यायाम करताना दिसत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अनिल कपूर हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत अॅक्शन थ्रिलर फायटरमध्ये दिसणार आहेत. याशिवाय रणबीर कपूरसोबत अॅनिमलमध्येही तो झळकणार आहेत.

टॅग्स :अनिल कपूरअनुपम खेर