Join us

अनुपम खेर सुटू-बूट घालून चक्क रिक्षात; सांगितलं स्क्रिनींगवेळी काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:58 IST

अनुपम खेर सध्या त्यांच्या शिव शास्त्री बलबोआ या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहेत

अभिनेता अनुपम खेर यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. शिव शास्त्री बलबोआ असं या चित्रपटाचे नाव असून राजधानी दिल्लीत या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनींग ठेवण्यात आलं होतं. मात्र, या स्क्रिनींगसाठी जाताना अलिशान कारमधून आलेल्या अनुपम खेर यांना चक्क रिक्षाने प्रवास करावा लागला. यावेळी, रिक्षावाल्याला मोठा आनंद झाला, त्याने खेर यांच्या हातात हात देत सेलिब्रिटी भाडे-प्रवासावर आनंद व्यक्त केला. 

अनुपम खेर सध्या त्यांच्या शिव शास्त्री बलबोआ या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहेत. त्यामुळेच, ते मीडियातही चर्चेत आहेत. या चित्रपटात चाहत्यांना ते वेगळ्यात अवतारात पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी, त्यांनी स्वत:ला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म केल्याचंही दिसून येत आहे. दरम्यान, रविवारी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिीनींग दिल्लीत ठेवण्यात आले होते. जेथे अभिनेते चक्क ऑटोतून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र, ड्रायव्हरच्या चुकीमुळे अनुपम खेर यांना रिक्षाने थेअटरमध्ये यावे लागले. स्वत: त्यांनी याबाबत माहिती दिली. 

स्क्रिनींगसाठी आपल्या कारमधून अनुपम खेर जात होते. मात्र, ड्रायव्हरने त्यांना वेगळ्याच थेअटरला पोहोचवले. त्यामुळे, वेळत स्क्रिनींगच्या थेअटरमध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी रिक्षाने प्रवास केला. कॅनॉट प्लेस येथे अनुपम खेर ऑटोतून उतरताना दिसून येतात. तर, रिक्षावाल्याचा हातात हात देऊन ते थेअटरकडे रवाना होतानाही दिसून येतात. दरम्यान, अभिनेत्याने स्वत: हा व्हिडिओ शेअर करत, कुछ भी हो सकता है... असे म्हटले. 

टॅग्स :अनुपम खेरऑटो रिक्षादिल्लीसिनेमा