Join us

अंकिता लोखंडेने शेअर केला 'फर्स्ट किस'चा व्हिडीओ, सुशांतच्या फॅन्सने दिल्या अशा प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 09:33 IST

सोशल मीडियावर अंकिता लोखंडेची मोठी फॅन फॉलोईंग आहे. ती आपल्या रोजच्या जीवनाविषयीचे अपडेट्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर चांगलीच चर्चेत आणि अॅक्टिव आहे. अनेक फोटोज आणि व्हिडीओज तिने गेल्या काही दिवसात फॅन्ससाठी शेअर केले आहेत. आता तिने यो यो हनी सिंहचं गाणं 'फर्स्ट किस' वर व्हिडीओ पोस्ट केलाय. याआधी 'हम आपके है कौन' सिनेमातील टायटल सॉंगवर व्हिडीओ तयार करून फॅन्ससोबत शेअर केला होता. यावर तिच्या फॅन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

सोशल मीडियावरअंकिता लोखंडेची मोठी फॅन फॉलोईंग आहे. ती आपल्या रोजच्या जीवनाविषयीचे अपडेट्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबतचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये दोघेही हिल्स स्टेशनवर दिसले होते. आता अंकिताचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओजमध्ये अंकिता गाण्यांवर लिपसिंकसोबत एक्सप्रेशन देत आहेत. अंकिताच्या या व्हिडीओवर तिचे अनेक फॅन्स भरभरून कमेंट करत आहेत. अनेकांनी कमेंट केली आहे की, तू सुशांतला विसरलीस का?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अंकिता साधारण ४० दिवस सोशल मीडियापासून दूर होती. यानंतर तिची सुशांतसाठीही पहिली पोस्ट फाच चर्चेत आली होती. सुशांत आणि अंकिताचं २०१६ मध्ये ब्रेकअप झालं होतं. त्यांचं रिलेशनशिप साधारण ६ वर्षे चाललं होतं. अंकिता आता विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसोशल व्हायरलसोशल मीडिया