Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेने यमुनाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मानधन घेतलं नाही, निर्मात्यांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 11:18 IST

अंकिता लोखंडेने 'स्वांतत्र्यवीर सावरकर' सिनेमात यमुनाबाईंची भूमिका साकारण्यासाठी एकही रुपया मानधन घेतलं नाही, निर्मात्यांचा खुलासा

'स्वांतत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. रणदीप हूडाने सिनेमात वीर सावरकरांची साकारलेली भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. रणदीपच्या अभिनयाचं कौतुक होतंय. शिवाय सिनेमात यमुनाबाई सावरकरांची भूमिका साकारली आहे अंकिता लोखंडे या अभिनेत्रीने. अंकिताने यमुनाबाईंची भूमिका साकारण्यासाठी एकही रुपया मानधन घेतलं नाही, असा खुलासा चक्क सिनेमाच्या निर्मात्यांनीच केलाय.

'स्वांतत्र्यवीर सावरकर' सिनेमाचे निर्माते संदीप सिंह यांनी याविषयी खुलासा केला की, "या सिनेमाआधी मी अनेक बड्या सिनेमांसोबत जोडला गेलोय. मी स्ट्रगलचे दिवसही पाहिले आहेत. या काळात खंबीरपणे माझ्या पाठीशी माझी मैत्रीण अंकिता लोखंडे होती. अंकितानेच मला दिग्दर्शक होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. याशिवाय जेव्हा मी स्वतः एखादा सिनेमा दिग्दर्शित करेन तेव्हा अंकिता त्यात अभिनय करेन."

निर्माते संदीप सिंह पुढे खुलासा करत म्हणाले, "सुरुवातीला माझ्या सिनेमात कोणीही काम करायला तयार नव्हतं. त्यावेळी अंकिताने माझ्यासोबत काम करण्याची तयारी दाखवली. यमुनाबाईंची भूमिका साकारताना तिने माझ्यासमोर एक अट ठेवली की, ती एकही रुपया मानधन घेणार नाही." अशाप्रकारे संदीप यांनी खुलासा केला. याशिवाय यापुढे त्यांच्या प्रत्येक सिनेमात अंकिता काम करेन, असंही ते म्हणाले.

टॅग्स :रणदीप हुडाविनायक दामोदर सावरकरअंकिता लोखंडे