Join us

Animal पेक्षाही जास्त भयानक असेल Animal Park, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 15:35 IST

Animal Park हा Animal चा सिक्वेल असणार आहे.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमाची क्रेझ पाहता मध्यरात्रीही शो सुरु आहेत. रणबीर कपूरने त्याच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलंय. सिनेमात खूप जास्त हिंसा, रक्तपात असल्याने अनेकांनी जोरदार टीकाही केली आहे. तरी सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढच होत आहे. Animal च्या शेवटी दिग्दर्शकाने सिनेमाचा सिक्वेल Animal Park ची हिंटही दिलीच आहे. आता सिक्वेल नेमका कसा असणार याबाबत संदीप रेड्डी वांगाने स्पष्टीकरण दिलं आहे.

Animal Park हा Animal चा सिक्वेल असणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने Animal Park साठी कंबर कसून तयार राहा असं सांगितलं आहे. मेकर्सच्या म्हणण्यानुसार, Animal Park मध्ये पहिल्या भागापेक्षाही जास्त हिंसा दाखवण्यात येणार आहे. तसंच सर्व कलाकारही जास्त गंभीर असणार आहेत. दिग्दर्शकाने प्रेक्षकांना वचन दिलं आहे की Animal Park याहून जास्त भयानक असणार आहे. रणबीरच्या कॅरेक्टरवरही काम करुन कधीही विचार केला नसेल इतकं भयानक त्याला दाखवण्यात येणार आहे.

प्रेक्षकांना Animal हाच सिनेमा इतका भयानक वाटला तर आता Animal Park वेळी काय होईल याची कल्पनाही करता येणार नाही. Animal सिनेमाने जगभरात 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर भारतात सिनेमाने 300 कोटी पार केले आहेत. आणखी बरेच आठवडे सिनेमाची कमाई तेजीत होईल असा अंदाज आहे.

टॅग्स :रणबीर कपूरसिनेमाबॉबी देओलरश्मिका मंदाना