Join us
Daily Top 2Weekly Top 5

'...तेव्हा प्रियंकाच्या चेहऱ्यावर निराशा, डोळ्यात अश्रू'; गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 19:32 IST

नुकतेच अनिल शर्मा यांनी प्रियंकाबाबत एक धक्कादायक खुलासा केला. 

प्रियांका चोप्रा ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. पण तिने हिंदी चित्रपटांपासून सुरु झालेल्या आपला प्रवास हॉलिवूडपर्यंत नेला आहे. आज ती एक जागतिक स्तरावरील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा प्रवास इतका सोपा नसला तरी त्यासाठी तिला खूप संघर्ष आणि मेहनत करावी लागली. नुकतेच अनिल शर्मा यांनी प्रियंकाबाबत एक धक्कादायक खुलासा केला. 

दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 2003 मध्ये प्रियंकाला 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ ए स्पाय' साइन केले होते. पण, दोन महिन्यानंतर जेव्हा त्यांनी तिला पाहिले तेव्हा ती एकदम वेगळी दिसत होती. कारण, सायनसच्या त्रासामुळे प्रियांकाच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली होती.  अनिल शर्मा यांनी सांगितले की, "जेव्हा ती कार्यालयात आई मधु चोप्रासोबत आली, तेव्हा ती उदास होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती मला साइनिंग अमाउंट परत करत होती. शिवाय तिने बरेलली वापस जाण्याचाही निर्णय घेतला होता. पण, मी तसे होऊ दिले नाही. एक चांगला मेकअप आर्टिस्ट शोधला आणि आम्ही तो चित्रपट पुर्ण केला". 

'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ ए स्पाय' चित्रपटात सनी देओल, प्रीती झिंटा, प्रियांका चोप्रा आणि अमरीश पुरी यांनी भूमिका केल्या होत्या. 2003 मध्ये रिलीज झाल्यावर या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिवाय, तो बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. येथूनच प्रियंकाची कारकीर्द सुरू झाली आणि तिने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. 

प्रियांका चोप्रा आणि अनिल शर्मा यांचा वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्रियंका अ‍ॅक्शन-थ्रिलर वेब सीरिज 'सिटाडेल' आणि रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'लव्ह अगेन'मध्ये दिसली होती.  दुसरीकडे, अनिल शर्मा सध्या दिग्दर्शित चित्रपट गदर 2 च्या यशाचा आनंद घेत आहेत. सनी देओल स्टारर हा चित्रपट हीट ठरलायं.

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड