Join us

'गदर'मध्ये गोविंदच्या कास्टिंगवरुन अनिल शर्मा यांनी सोडलं मौन, म्हणाले- हा सिनेमा सनीचा होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 15:39 IST

अलिकडेच एका मुलखतीत अनिल शर्मा यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर २ हा सिनेमा सध्या  बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. तब्बल २२ वर्षानंतर रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा चर्चेत आला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडित काढले. एकीकडे सिनेमाच्या यशाचं कौतुक होत असताना दुसरीकडे सिनेमाच्या दिग्दर्शकावर टीमध्ये गोविंदाला कास्ट करण्याचा आरोप लावण्यात आला होत, यावर त्यांनी आता मौन सोडलं आहे.   

अलिकडेच एका मुलखतीत अनिल शर्मा म्हणाले, गोविंदाशी अनेक वर्षांपूर्वी झालेल्या संवादाचा त्याने चुकीचा अर्थ काढला. त्यामुळेच अभिनेत्याला असं वाटलं की त्याला ही भूमिका ऑफर करण्यात आली. या मुलाखती त्यांनी हेदेखील सांगितले की, गोविंदाशी बोलण्यापूर्वीच सनी देओलला याभूमिकेसाठी साईन करण्यात आलं होतं. 

पुढे ते म्हणाले, त्या सिनेमात गोविंदा कसा असू शकतो? हा सिनेमा नेहमीच सनी देओलसाठीच होता. त्यावेळी मी गोविंदासोबत एका वेगळ्या गोष्टीवर काम करत होतो. त्यांना मी सांगितलं होतं सनी देओलसाठी माझ्याकडे एक कथा आहे. बरं झालं ही कथा घेऊन मी सनी देओलकडे गेलो कारण ते हा सिनेमात काम देखील करु शकत नव्हते असं गोविंदा मला म्हणाले होते.    

काही दिवसांपूर्वी अमिषा पटेलने देखील अनिल शर्मा यांच्यावर आरोप केले होते. त्यांना पहिल्या गदरमध्ये माझ्या जागी ममता कुलकर्णीला घ्याचे होते. आणि तारा सिंगच्या भूमिकेत गोविंदाला, मात्र असं होऊ शकले नाही.  

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेल