Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या ‘या’ झक्कास पतीने लग्नाच्या वाढदिवसानिमीत्त पत्नीसाठी लिहिली ‘ही’ खास पोस्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 18:20 IST

अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनिता कपूर यांचा १९ मे रोजी लग्नाचा ३५वा वाढदिवस असतो. त्या निमित्ताने अनिल कपूरने पत्नीसाठी एक पोस्ट लिहिला आहे. या पोस्टमधून अनिल कपूर आणि सुनिता यांच्यातील मैत्रीचे तसेच पती-पत्नीचे घट्ट नाते दिसून येत आहे.

बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनिता कपूर यांचा १९ मे रोजी लग्नाचा ३५वा वाढदिवस असतो. त्या निमित्ताने अनिल कपूरने पत्नीसाठी एक पोस्ट लिहिला आहे. या पोस्टमधून अनिल कपूर आणि सुनिता यांच्यातील मैत्रीचे तसेच पती-पत्नीचे घट्ट नाते दिसून येत आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की,‘माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी घटना म्हणजे तू माझ्या आयुष्यात येणे. आपला जीवन प्रवास हा एक खडतर प्रवास आहे. मी माझ्या आयुष्यातील उर्वरीत ४६ वर्षे तुझ्यासोबत घालवू इच्छितो! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सुनिता कपूर! लव्ह यू’ असे अनिल कपूरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले होते.

दरम्यान अनील कपूर यांची पत्नी सुनिता कपूर यांनी देखील इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत अनिल कपूर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांची ही पोस्ट पाहता अनिल कपूर आणि सुनिता यांच्यातील प्रेम दिसत होते.

सध्या अनिल कपूर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये करिना कपूर खान, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, विकी कौशल, भूमी पेडणेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. तसेच हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अनिल कपूरलग्न