Anil Kapoor: बॉलिवूडचा झक्कास हिरो अशी ओळख असलेले अनिल कपूर (Anil Kapoor) आज यशाच्या शिखरावर आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव अग्रस्थानी आहे. आजही अनिल कपूर स्क्रिनवर येतात तेव्हा आपली एक वेगळी छाप सोडतात. सध्या ते 'सूबेदार' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.अनिल कपूर आपल्या अभिनयासह बेधडक वक्तव्यासाठी देखील ओळखले जातात.नुकताच सूबेदार चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेन्ट पार पडला. यादरम्यान,त्यांनी एक मजेदार किस्सा शेअर केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अनिल कपूर आजही पत्नीकडून मागतात पॉकेट मनी
सूबेदारच्या इव्हेंटमध्ये माध्यमांशी बोलताना अनिल म्हणाले की, माझ्या घरी कोणीही माझे चाहते नाहीत. शिवाय आजही कुठे जाताना ते पत्नीकडून पॉकेट मनी मागतात, असं त्यांनी सांगितलं. यावेळी इव्हेन्टमध्ये ते म्हणाले, "माझ्या घरी कोणालाही माझ्या कामाचं कौतुक नसतं. आज मी घरातून निघताना सुनीताला म्हणालो... मी एका ट्रेलर लॉन्च कार्यक्रमासाठी जात आहे. तिने विचारलं कोणता सिनेमा आहे? शिवाय माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये काय चाललंय याची तिला फारशी कल्पना नसते. माझ्या घरी साधारण अशीच परिस्थिती असते. कधी-कधी शूटला निघण्यापूर्वी मी १० ते १५ हजार कॅश मागतो." त्यानंतर आपल्या यशाचं श्रेय पत्नीला देत अनिल कपूर म्हणाले, "आज मी जो काही आहे ते फक्त तिच्यामुळे शक्य झालं आहे. तिने माझ्या करिअरसाठी खूप गोष्टींना बाजूला ठेवलं." असं देखील त्यांनी सांगितलं.
सुरेश त्रिवेणी यांनी दिग्दर्शित केलेला 'सूबेदार' हा चित्रपट ५ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात न येता थेट 'अॅमेझॉन प्राईम' (Amazon Prime) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ॲक्शन आणि इमोशन्सने भरलेला हा चित्रपट अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी एक मोठी मेजवानी ठरेल.
Web Summary : Despite his superstar status, Anil Kapoor humorously admits to asking his wife, Sunita, for pocket money. He credits her sacrifices for his success, revealing she isn't overly involved in his career. His film 'Soobedar' releases on Amazon Prime.
Web Summary : सुपरस्टार होने के बावजूद, अनिल कपूर मजाक में स्वीकार करते हैं कि वह अपनी पत्नी सुनीता से पॉकेट मनी मांगते हैं। वह अपनी सफलता का श्रेय उनके बलिदानों को देते हैं, और बताते हैं कि वह उनके करियर में ज्यादा शामिल नहीं हैं। उनकी फिल्म 'सूबेदार' अमेज़न प्राइम पर रिलीज हो रही है।