Join us

हे आहे अनिल कपूरच्या फिटनेसचे सिक्रेट... त्यानेच सोशल मीडियाद्वारे उलगडलं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:53 IST

अनिलच्या अभिनयाइतकी त्याच्या फिटनेसची देखील चर्चा केली जाते.

ठळक मुद्देअनिलने साईट लूक मधील फोटो पोस्ट केला असून त्याने एक प्रेरणादायी संदेश लिहिला आहे. त्याने पोस्टसोबत लिहिले आहे की, आव्हानांमुळे आयुष्य अधिक रंजक बनतं..

अनिल कपूरचे वय वाढतेय पण या वाढत्या वयाचा कुठलाच परिणाम त्याच्यावर होताना दिसत नाहीय. खरे तर अनिलने साठी ओलांडलीय, पण त्याचा उत्साह नव्यांना लाजवणारा आहे. नव्या दमाचे अभिनेते करतात, त्यापेक्षा कितीतरी अधिक काम अनिल कपूर करतोय. अनिल कपूरचे सगळेच चित्रपट हिट होतात. काहीच महिन्यांपूर्वी मलंग या चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात अनिल दिसला होता.

अनिलच्या अभिनयाइतकी त्याच्या फिटनेसची देखील चर्चा केली जाते. अनिल त्याच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतो. तो आजही या वयात कित्येक तास जीममध्ये घाम गाळतो. तो कितीही बिझी असला तरी तो व्यायाम करणं चुकवत नाही. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामला व्यायाम करतानाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. 

अनिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये आपल्याला तो काळ्या रंगाच्या जिमच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. तसेच दुसऱ्या फोटोत त्याने साईट लूक मधील फोटो पोस्ट केला असून त्याने एक प्रेरणादायी संदेश लिहिला आहे. त्याने पोस्टसोबत लिहिले आहे की, आव्हानांमुळे आयुष्य अधिक रंजक बनतं... 

अनिलने आणखी पोस्ट केलेल्या एका फोटोत तो सायकलिंग करताना दिसत आहे. त्यासोबत त्याने लिहिले आहे की, अशाचप्रकारे व्यायाम करत राहा...

अनिल कपूरचे हे प्रेरणादायी फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. ते त्याच्यावर भरभरून कमेंट देखील करत आहेत. 

टॅग्स :अनिल कपूर