आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा हा दुसरा भाग बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. १९ मार्च रोजी सिनेमा रिलीज होतोय. तसंच दुसऱ्या भागात कोण कोण नवीन चेहरे दिसणार याचीही सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. यामी गौतम आणि विकी कौशलच्या कॅमिओची चर्चा रंगली असतानाच अनिल कपूरने मोठा खुलासा केला आहे. त्याला 'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये छोट्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने नकार दिला असं तो म्हणाला. काय होतं कारण?
अनिल कपूर सध्या 'सुबेदार' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतीच त्याने इंडिया टुडेला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, "आदित्य धर 'धुरंधर २'मध्ये मला कास्ट करण्यासाठी माझ्याकडे आला होता. मी सिनेमात एक छोटा कॅमिओ करु अशी त्याची इच्छा होती. पण मी आज जो काही आहे तो माझ्या प्रोफेशनलिजम आणि कमिटमेंटमुळे आहे. हे खूप गरजेचं आहे, तुम्ही फक्त टॅलेंटमुळे इथपर्यंत पोहोचू शकत नाही. मी त्यावेळी इतर फिल्ममेकर्सना आधीच कमिटमेंट दिली होती. माझ्या तारखा दिल्या होत्या. मी आदित्यला म्हणालो की मला हा कॅमिओ करायची इच्छा आहे आणि मला भूमिकाही आवडली आहे पण मी तेव्हाच दुसरे सिनेमे करत आहे. आदित्यचा धुरंधर २ रिलीज होतोय आणि नक्कीच हा दमदार सिनेमा असणार. हे माझं नुकसान आहे, पण काही हरकत नाही."
आदित्य धरसोबत नक्की काम करेन
अनिल कपूर म्हणाला, "हेच जर मी आधीच आदित्यला तारीख दिली असती, आणि कोणा दुसऱ्या फिल्ममेकरने ज्याचा सर्वात सुपरहिट सिनेमा दिला असेल त्याने मला त्याच्या सिनेमासाठी विचारणा केली असती तरी मी आदित्यशी कमिटेड राहिलो असतो. आपण ज्याला आधीच तारीख दिली आहे ती कॅन्सल करणं अनप्रोफेशनल समजलं जातं. पण मी आदित्यसोबत पुन्हा नक्की काम करेन. धुरंधर ३ जर आला तर तो नाही पण मला त्याच्यासोबत काहीतकी नवीन करायला आवडेल."
Web Summary : Anil Kapoor declined a cameo in 'Dhurandar: The Revenge' due to prior commitments, emphasizing his professionalism. He expressed interest in future collaborations with director Aditya Dhar.
Web Summary : अनिल कपूर ने पूर्व प्रतिबद्धताओं के कारण 'धुरंधर: द रिवेंज' में कैमियो करने से इनकार कर दिया, अपनी व्यावसायिकता पर जोर दिया। उन्होंने निर्देशक आदित्य धर के साथ भविष्य में सहयोग करने में रुचि व्यक्त की।