विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि सर्व क्रिकेटप्रेमी निराश झाले. आता विराट पुन्ह कसोटी सामन्यात दिसणार नाही हे मान्य करणंच कठीण झालं आहे. निवृत्तीनंतर विराट अनुष्काने (Anushka Sharma) प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. त्यांचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. अनुष्का बऱ्याच वर्षांपासून आपलं फिल्मी करिअर बाजूला ठेवून विराटची साथ देत आहे. म्हणूनच विराट-अनुष्का खरोखरंच एक आदर्श कपल म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला माहितीये का 'दिल धडकने दो' सिनेमाच्या शूटिंगवेळी विराटने सेटवर जात अनुष्काला सरप्राईज दिलं होतं.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्याच्यासाठी पोस्ट लिहिली. अनिल कपूरनेही पोस्ट शेअर केली होती. यात ते लिहितात, "आम्ही ११ वर्षांपूर्वी क्रूझवर भेटलो होतो. दिल धडकने दो चं शूट सुरु होतं. अनुष्काही आमच्यासोबत होती. मला आठवतंय विराट तू तेव्हाही किती नम्र आणि जमिनीशी जोडलेला होतास. माझ्यावर तर तू मोठा प्रभाव पाडलास. तेव्हापासून मी दूरुनच तुझी स्तुती करतो. तुझं अनुशासन, पॅशन...मैदानावर तू मिळवलेलं यश पाहून ते आम्हाला खूप आनंद आणि गर्व वाटतो. आपण त्या दिवसानंतर भेटलो नाही पण मी नेहमीच तुझ्यासाठी खूश होत राहिलो. तू जे मिळवलं आहेस त्यासाठी शुभेच्छा. कसोटीतून तू जरी निवृत्त झाला असला तरील १४० कोटी भारतीयांच्या मनातून तू कधीच निवृत्त होणार नाहीस. थँक यू विराट."
'दिल धडकने दो' सिनेमा २०१५ मध्ये रिलीज झाला होता. त्याही आधीपासून विराट अनुष्काच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनी आपलं नातं कधीच मान्य केलं नव्हतं. शेवटी २०१७ साली त्यांनी इटलीत लग्नगाठ बांधली.