Join us

अनिल कपूरचा आहे आलिशान बंगला, बंगल्याचे फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 19:00 IST

अनिल कपूरचा मुंबईत आलिशान बंगला असून घराचे फोटो पाहून थक्क व्हाल

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने वयाची साठी उलटलेली असतानाही आजही तो फिट आहे. त्याच्या फिटनेससोबत त्याची एनर्जीदेखील तरूणांना लाजवेल अशी आहे. अनिल कपूरने त्याच्या सिनेकारकीर्दीत एकाहून एक सरस सुपरहिट चित्रपट दिले आहेत. फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येसुद्धा अनिल कपूर प्रचलित आहे. आज तो करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक असून त्याचा स्वतःचा आलिशान बंगला आहे. 

अनिल कपूरचे घरावर खास प्रेम आहे. या घराचे इंटेरियर त्याने स्वतःच्या आवडीनं पत्नीकडून करून घेतलं आहे.

अनिल कपूर जिथे कुठे जातो तिथून घराच्या सुशोभिकरणासाठी लागणाऱ्या वस्तू आठवणीने घेऊन येतो. त्यांचे हे शानदार घर त्यांची पत्नी सूनिता आहुजाने सजवले आहे. घरातील जास्त वस्तू या अनिल कपूरच्या आवडीनिवडींचा विचार करूनच बनवल्या गेल्या आहेत. 

लग्नाच्या आधी अभिनेत्री सोनम कपूर ही अनिल कपूर सोबतच राहायची परंतु लग्न झाल्यानंतर आता ती तिचे पती आनंद आहुजासोबत राहते तर अनिल कपूर यांची दुसरी मुलगी रिया कपूर की अजूनही तिच्या वडिलांसोबतच राहते.

अनिल यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात उमेश मेहरा यांचा १९७९ मध्ये आलेल्या हमारे तुम्हारे या चित्रपटांमधून केली होती. या चित्रपटांमधून ते एका सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले होते.

१९८३ साली आलेल्या वो सात दिन या चित्रपटांमधून त्यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

त्यानंतर अनिल कपूरच्या करियरला नवी कलाटणी मिळाली.

त्यानंतर त्याने  स्लमडॉग मिलेनियर ,सलाम -ए- इश्क ,बेवफा ,अरमान, नायक, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, दिल धडकने दो, वेलकम, तेजाब, घर हो तो ऐसा या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूर