बॉलिवूडचे 'एव्हरग्रीन' अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अनिल कपूर वयाच्या ६९ व्या वर्षीही त्यांच्या फिटनेस आणि लूकमुळे तरुण कलाकारांनाही टक्कर देतात. नुकताच त्यांनी त्यांचा एक नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला असून, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पहिल्यांदाच अनिल कपूर पूर्णपणे पांढऱ्या केसांत आणि पांढऱ्या मिशांमध्ये पाहायला मिळत आहेत.
अनिल कपूर यांचा नवा लूकअनिल कपूर यांनी इंस्टाग्रामवर आपला हा नवा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "कोणालाच माहित नाही... पुढे काय होणार आहे." या लूकमुळे ते अत्यंत मॅच्युअर आणि डॅशिंग दिसत आहेत. त्यांच्या या लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून अनेकांनी यावर 'फायर' आणि 'हार्ट' इमोजींचा वर्षाव केला आहे.
अनिल कपूर यांच्या या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनवर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिने कमेंट करत कौतुक केले आहे. याशिवाय रितेश देशमुखने केलेली कमेंटही चर्चेत आहे. ''Mind Blowing! या लूकमध्ये तुम्ही किती भारी दिसत आहात''. याशिवाय विजय वर्मा, मनीष पॉल, हृतिक रोशन यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही त्यांच्या या 'झक्कास' लूकवर पसंती दर्शवली आहे. कोरिओग्राफर वैभवी मर्चंट हिनेही हा लूक आवडल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे.
नव्या प्रोजेक्टची तयारी? अनिल कपूर यांनी हा लूक नेमका कशासाठी केला आहे, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र, चाहत्यांमध्ये अशी चर्चा आहे की, हा लूक त्यांच्या आगामी एखाद्या चित्रपटासाठी किंवा वेब सीरिजसाठी असू शकतो. अनिल कपूर हे नेहमीच आपल्या भूमिकेसाठी वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात, त्यामुळे या लूकमागे नक्कीच काहीतरी मोठे रहस्य दडलेले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.
कामाच्या आघाडीवर बोलायचे झाले तर, अनिल कपूर अलीकडेच 'वॉर २' मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. आता त्यांच्या या नव्या लूकमुळे चाहत्यांची उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे.
Web Summary : Anil Kapoor's new grey-haired look has taken the internet by storm. Celebrities like Riteish Deshmukh praised the mature and dashing appearance. Fans speculate it's for an upcoming project, adding to the actor's reputation for transformative roles.
Web Summary : अनिल कपूर का नया ग्रे बालों वाला लुक इंटरनेट पर छाया हुआ है। रितेश देशमुख जैसी हस्तियों ने इस परिपक्व और डैशिंग लुक की प्रशंसा की। प्रशंसकों का अनुमान है कि यह आगामी परियोजना के लिए है।