Join us

अनिल कपूरने हा जुना फोटो शेअर करून दिल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 18:40 IST

अनिलने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा आणि सुनीताचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अनिल आणि सुनीता यांच्या तरुणपणातील असून अनिल या फोटोत तिच्याकडे पाहाताना दिसत आहे.

ठळक मुद्देअनिलने पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे आयुष्य दररोज अधिकाधिक चांगले हे केवळ तुझ्यामुळे बनते. माझ्या आनंदाचे कारण तूच आहेस. तू खूप सुंदर आहेस. तू माझ्या आयुष्यात असल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूरचा आज वाढदिवस असून अनिलने सोशल मीडियाद्वारे आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या खूपच छान शुभेच्छा दिल्या आहेत. अनिलने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा आणि सुनीताचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अनिल आणि सुनीता यांच्या तरुणपणातील असून अनिल या फोटोत तिच्याकडे पाहाताना दिसत आहे. या फोटोत ते दोघे खूपच सुंदर दिसत असून त्यांची जोडी ही खूपच क्यूट जोडी असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. या फोटोसोबत अनिलने खूपच छान पोस्ट देखील लिहिली आहे. अनिलने पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे आयुष्य दररोज अधिकाधिक चांगले हे केवळ तुझ्यामुळे बनते. माझ्या आनंदाचे कारण तूच आहेस. तू खूप सुंदर आहेस. तू माझ्या आयुष्यात असल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. लव्ह यू...

अनिल प्रमाणेच त्याच्या दोन मुलींनी देखील सोशल मीडियाद्वारे आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमने तिच्या लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामला पोस्ट केला आहे. या फोटोत ती तिच्या आईला किस करताना आणि अलिंगन देताना दिसत आहे. सोनम, रिया आणि हर्षवर्धन हे तिघेही या फोटोत सुनीतासोबत आहेत. सोनमने या फोटोसोबत लिहिले आहे की, तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तू माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहेस. तू नेहमीच माझ्या पाठिशी उभी राहिली आहे, मला मदत केली आहेस. माझ्या आयुष्यात ज्यावेळी समस्या आल्या, त्यावेळी तू त्याला खंबीरपणे तोंड दिले. तुझ्यामुळेच आपले कुटुंब आज इतके खूश आहे. आम्ही सगळेच तुझ्यावर खूप प्रेम करतो. मॉम, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

सोनमची बहीण रियाने देखील तिच्या लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामला शेअर करत तिच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने म्हटले आहे की, तुझ्यामुळेच मी एक चांगली व्यक्ती बनू शकले. मॉम, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूर