Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सगळ्या पोस्ट डिलीट, पब्लिसिटी स्टंट की हॅक? सोनम कपूरलाही पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 16:15 IST

अनिल कपूर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे का? की अनिल कपूर यांनी सोशल मीडियावरुन संन्यास घेतला आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनिल कपूर यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरलाही हाच प्रश्न पडला आहे. 

दमदार अभिनयाने ८०-९०चं दशक गाजवलेले बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर चर्चेत आले आहेत. अनिल कपूर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सगळ्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा प्रोफाइल फोटोही गायब झाला आहे. त्यामुळे अनिल कपूर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे का? की अनिल कपूर यांनी सोशल मीडियावरुन संन्यास घेतला आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनिल कपूर यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरलाही हाच प्रश्न पडला आहे. 

अनिल कपूर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा फोटो सोनम कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने "डॅड?" असं लिहिलं आहे. अनिल कपूर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट डिलीट झाल्या असल्या तरी त्यांचे फॉलोवर्सआी संख्या घटलेली नाही. तसंच अनिल कपूर फॉलो करत असलेल्या लिस्टमध्ये  कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे नक्की अनिल कपूरचं यांचं अकाऊंट हॅक झालं आहे की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याआधीही अनेक कलाकारांनी असे पब्लिसिटी स्टंट केले आहेत. अभिनेत्री काजोलनेही सीरिजच्या प्रमोशनसाठी सोशल मीडिया अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. 

दरम्यान, अनिल कपूर 'अॅनिमल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल कपूर यांनी 'अॅनिमल'मधील लूक त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. 

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूरसेलिब्रिटी