Join us
Daily Top 2Weekly Top 5

Memes Viral : तू कितने बरस का? अनिल कपूरचा ‘हा’ फोटो पाहून लोकांना लागलं याडं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 15:12 IST

होय, ६२ वर्षांच्या अनिल कपूर यांना इतके फिट पाहून सगळेच अचंबित झालेत. मग काय, चाहत्यांच्या कल्पनाशक्तीला इतका ऊत आला की, अनिल कपूर यांच्या या तरूण दिसण्यावर एकापाठोपाठ एक असे अनेक मीम्स व्हायरल होऊ लागलेत.

ठळक मुद्देअनिल कपूर कधी जन्मले?  या प्रश्नाचे उत्तर देत, एका युजरने तर अनिल कपूरच्या जन्मासंदर्भात एक अख्खा निबंधचं लिहिला.

गत सोमवारी अनिल कपूर यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव आहे, ‘मलंग’. चित्रपटाची घोषणा करताना अनिल कपूर यांनी एक फोटोही शेअर केला. या फोटोत अभिनेता आदित्य राय कपूर, कुणाल खेमू दिशा पटानी, चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सूरी आणि स्वत: अनिल कपूर अशी सगळी स्टारकास्ट दिसली. पण हा फोटो शेअर झाला आणि सोशल मीडिया क्रेजी झाला. कारण काय तर अनिल कपूर. होय, ६२ वर्षांच्या अनिल कपूर यांना इतके फिट पाहून सगळेच अचंबित झालेत. मग काय, चाहत्यांच्या कल्पनाशक्तीला इतका ऊत आला की, अनिल कपूर यांच्या या तरूण दिसण्यावर एकापाठोपाठ एक असे अनेक मीम्स व्हायरल होऊ लागलेत.

२०४५ मध्ये ‘गुंडे 2’ रिलीज होईल आणि यात अनिल कपूर तैमूर अली खानसोबत लीडमध्ये असतील, असे एका युजरने लिहिले.

अनेकांना तर अनिल कपूर यांना पाहून अनेक प्रश्न पडले. तुझे वय सामान्य माणसांसारखे दिसत नाही. तुझ्याकडे काही सुपर पॉवर तर नाही? असा प्रश्न एकाने केला. तर हा ३२ वर्षांपूर्वीचाच ‘मिस्टर इंडिया’ आहे ना? असा सवाल एका युजरने विचारला. आता वेड लागायची पाळी आलीय. तू खरोखरचं ६२ वर्षांचा आहेस? असा प्रश्नही अन्य एका युजरने केला.

अनिल कपूर कधी जन्मले?  या प्रश्नाचे उत्तर देत, एका युजरने तर अनिल कपूरच्या जन्मासंदर्भात एक अख्खा निबंधचं लिहिला. एकंदर काय तर, अनिल कपूर यांच्या तरूण दिसण्याचे रहस्य काय? या प्रश्नाने अनेकांना छळले अन् यावरच्या भन्नाट मीम्सनी लोकांना पोटभर हसवले. तेव्हा पाहा तर...

 

टॅग्स :अनिल कपूर