Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अनन्या पांडेची बहीण अलानाने बॉयफ्रेन्डसोबत केला असा योगा, फॅन म्हणाले - अरे देवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 14:43 IST

लाना पांडे सोशल मीडियावर चांगली पॉप्युलर आहे. ती तिचा बॉयफ्रेन्ड Ivor Mccray V सोबत फोटो आणि व्हिडीओज पोस्ट करत राहते.

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो पोस्ट करून चर्चेत आली होती. तिने बाथरूममध्ये बॉयफ्रेन्डला किस करतानाचा फोटो पोस्ट केला होात. आता तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ती एक्रो योगा करताना दिसत आहे. यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

अलाना पांडे सोशल मीडियावर चांगली पॉप्युलर आहे. ती तिचा बॉयफ्रेन्ड Ivor Mccray V सोबत फोटो आणि व्हिडीओज पोस्ट करत राहते. दोघांनाही फिरायची फार आवड आहे. ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत जगभर फिरत आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ बघायला मिळतील.

सध्या त्यांचा योगाचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यात अलानाने बॉयफ्रेन्डला योगा करताना किस करत आहे. यावर तिच्या अनेक फॉलोअर्सने कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'अरे देवा तुझे पॅरेंट्स तुला असं करताना बघू शकतात'.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलाना तिच्या बॉयफ्रेन्ड मिळून यूट्यूब चॅनल चालवते. यावर ती तिच्या ट्रॅव्हल स्टोरी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच अलानाने बॉयफ्रेन्डसाठी वाढदिवसाला लांबलचक पोस्ट लिहिली होती.  

टॅग्स :बॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल